Archana Gautam | एकेकाळी अशी दिसायची बिकिनी मॉडेल अर्चना गौतम; सेल्सची नोकरी ते बिग बॉसपर्यंतचा प्रवास

अर्चना गौतमचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका शोसाठी ऑडिशन देताना दिसत आहे. नऊ वर्षांपूर्वी अर्चना कशी दिसायची हे पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत.

Archana Gautam | एकेकाळी अशी दिसायची बिकिनी मॉडेल अर्चना गौतम; सेल्सची नोकरी ते बिग बॉसपर्यंतचा प्रवास
Archana GautamImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 1:02 PM

मुंबई: बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या सिझनमध्ये कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकण्यात बाजी मारणार, याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. बिग बॉसच्या घरातील चार स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये अर्चना गौतम, प्रियांका चहर चौधरी, शालीन भनोट आणि निमृत कौर आहलुवालिया यांचा समावेश आहे. तर एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि सुम्बुल तौकिर खान हे नॉमिनेट झाले आहेत. यादरम्यान अर्चना गौतमचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका शोसाठी ऑडिशन देताना दिसत आहे. नऊ वर्षांपूर्वी अर्चना कशी दिसायची हे पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत.

अर्चनाचा हा व्हिडीओ ‘बाजीगर’ या शोचा असल्याचं कळतंय. या शोच्या परीक्षकपदी भोजपुरी स्टार आणि राजकारणी रवी किशन, पंकज भदौरिया आणि इतर कलाकार आहेत. या शोमध्ये अर्चना सांगते की तिने रिअल इस्टेटमध्येही काम केलं आहे. तर रवी किशन यांच्यासमोर ती सेल कॉलसुद्धा करून दाखवते. अर्चनाचा हा साधासरळ लूक पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

कोण आहे अर्चना गौतम?

उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये राहणाऱ्या अर्चनाचा जन्म 1 सप्टेंबर 1995 रोजी झाला. अर्चना एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिच्या वडिलांचं नाव गौतम बुद्ध आहे. अर्चनाचे वडील राजकारण सक्रिय असल्याचं कळतंय. तर तिची आई गृहिणी आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच अर्चनालाही राजकारणात नाव कमवायचं आहे. ती निवडणूकसुद्धा लढली आहे. मात्र निवडणुकीत अर्चनाला यश मिळालं नाही.

अर्चनाला का म्हटलं जातं बिकिनी मॉडेल?

अर्चनाने टीव्ही आणि प्रिंटच्या जाहिरातीतून करिअरची सुरुवात केली. तिने ग्रेट ग्रँड मस्ती आणि हसीना पारकार यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. 2018 मध्ये तिने ‘मिस बिकिनी इंडिया’ या स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हापासून ती बिकिनी गर्ल म्हणून ओळखलं जातं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.