‘त्यांच्याशी हस्तांदोलन करताच तोंडून आपोआप जय हिंद निघायचं’, सीडीएस जनरल बिपिन रावत यांना बॉलिवूडची आदरांजली

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य अधिकारी मिळून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या दु:खद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रावत यांच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूडमधूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकारांनी ट्विटरद्वारे बिपिन रावत आणि अन्य मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'त्यांच्याशी हस्तांदोलन करताच तोंडून आपोआप जय हिंद निघायचं', सीडीएस जनरल बिपिन रावत यांना बॉलिवूडची आदरांजली
सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 11:05 PM

मुंबई : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief of Defense Staff) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि अन्य अधिकारी मिळून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या दु:खद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रावत यांच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूडमधूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकारांनी ट्विटरद्वारे बिपिन रावत आणि अन्य मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अनुपम खेर म्हणाले की, सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि अन्य 11 सैन्य अधिकाऱ्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झालं. जनरल रावत यांची भेट घेण्याचं सौभाग्य मला अनेकदा मिळालं. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रचंड धाडस आणि देशाप्रती प्रेम होतं. त्यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर हृदय आणि तोंडून आपोआप ‘जय हिंद’ निघत होतं.

अभिनेता सलमान खान यानेही ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि संरक्षण दलातील इतर जवान ज्या दुर्घटनेत आपण गमावले त्या दुर्घटनेबद्दल ऐकून खूप दुःख झाले. माझ्या भावना, माझी प्रार्थना आणि संवेदना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत’, असं ट्विट अभिनेता सलमान खान याने केलंय.

अभिनेता विवेक ओबेरॉय आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या मृत्यूबाबत माहिती मिळाल्यानंतर दु:ख वाटलं. सर, मातृभूमीच्या चार दशके निस्वार्थ सेवेसाठी आम्ही तुम्हाला सलाम करतोय. मी भारताच्या सर्वात सक्षम सैनिकांमधून एका सैनिक गमावल्याच्या दु:खात देशासोबत आहे.

लारा दत्ताने ट्विट केलं की, जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 सैनिकांच्या परिवारासाठी मी प्रार्थना करते, जे आज कुनूरमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू पावले. संरक्षण दलांसाठी हा दु:खद दिवस आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.

अभिनेता सिद्धार्थ म्हणतो की, सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील निधनाची विनाशकारी बातमी आहे. त्यांच्या परिवारासाठी मी प्रार्थना करतो. जीवन खूप नाजूक आणि अप्रत्याशित आहे.

अभिनेती तमन्ना भाटीयानेही रावत यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 अधिकाऱ्यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं.

बॉलिवूडसह साऊथमधील अनेक अभिनेते आणि दिग्गजांनी सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

इतर बातम्या :

Bipin Rawat Helicopter crash : कोण होते सीडीएस जनरल बिपिन रावत? जाणून घ्या रावत यांचा लष्करातील संपूर्ण प्रवास

‘बिपिन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही’, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण, राष्ट्रपती, संरक्षणमंत्र्यांकडूनही आदरांजली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.