Bollywood Corona | आधी पार्टी , मग क्वारंटाईन, बॉलिवूडवर कोरोनाचे सावट,अभिनेता संजय कपूर यांचं घराबाहेर लागले क्वारंटाईनचे बोर्ड
महानगर पालिकेकडून अभिनेता संजय कपूर यांच्या घराबाहेर क्वारंटाईनचे बोर्ड लावण्यात आला आहे. संजय कपूर यांनी स्वत: महीप कपूरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
मुंबई : एक वर्ष कोरोना महामारीने संपूर्ण जगाला बंदी करुन ठेवले. काही काळापासूनच सामान्य जन जीवन पूर्वपदावर येत होते . पण आता हा आजार पुन्हा एकदा हातपाय पसरू लागला आहे. सोमवारी (13 डिसेंबर) करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अमृता अरोरा (Amruta Arora) अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor) हिचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला. यावर खबरदारी म्हणून अभिनेता संजय कपूर यांच्या पत्नी आणि मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मनपाने इमारतीत कारवाई केली. गुरुवारी बीएमसी संजय कपूर यांच्या संपूर्ण इमारतीत स्वच्छता करण्यासाठी पोहोचली.
संजय कपूरने स्वत: दिली माहिती महानगर पालिकेकडून अभिनेता संजय कपूर यांच्या घराबाहेर क्वारंटाईनचे बोर्ड लावण्यात आला आहे. संजय कपूर यांनी स्वत: महीप कपूरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. महीपने आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. बुधवारी शनाया कपूरने एका इन्स्टा पोस्टमध्ये स्वत:ला कोरोना असल्याचा खुलासा केला. अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहेल खानची पत्नी सीमा खानला देखील कोरोनाची लागण झाली असून तिच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
यांना ही झाली कोरोनाची लागण अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor) हिचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यासोबतच सोहेल खानची पत्नी सीमा खानचाही (Seema Khan) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या चारही सेलिब्रिटी इंडस्ट्रीमध्ये ‘गर्ल गॅंग पार्टी’साठी खूप प्रसिद्ध आहेत.
करण जोहरचे स्पष्टीकरण
यानंतर आपली नाराजी व्यक्त करत करण जोहरने लिहिले की, ‘मी मीडियाच्या काही सदस्यांना हे स्पष्ट करू इच्छितो की 8 लोकांच्या उपस्थित झालेल्या या जेवणाच्या कार्यक्रमाला पार्टी म्हटले जात नाही. माझे घर, जिथे कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल कडक पाळले जातात, ते नक्कीच कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणार नाही. मी मीडियाच्या काही सदस्यांना त्यांच्या वृत्तांकनावर थोडा संयम ठेवण्याचे आवाहन करतो. असे स्पष्टीकरण दिले.
संबंधीत बातम्या :
अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ब्रेक, विजेच्या धक्क्याने अकरावीतील मुलीचे हात निकामी…
मोसंबीच्या व्यवस्थापनासाठी मराठवाड्यात ‘सिट्रस इस्टेट’ची घोषणा, नेमका काय होणार फायदा ?