‘ॲनिमल’ची इतकी हवा, पण बॉबी देओलला मर्यादीत सीन्स का? प्रेक्षकांच्या प्रश्नावर अभिनेत्याने सोडलं मौन

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी ‘ब्लॉकबस्टर’ म्हटलंय. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि अनिल कपूर यांच्याशिवाय अभिनेता बॉबी देओलने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. मात्र चित्रपटात त्याच्या भूमिकेला पुरेसा स्क्रीन टाइम मिळाला नाही, अशी तक्रार काहींनी केली आहे.

'ॲनिमल'ची इतकी हवा, पण बॉबी देओलला मर्यादीत सीन्स का? प्रेक्षकांच्या प्रश्नावर अभिनेत्याने सोडलं मौन
Bobby Deol in AnimalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 8:20 AM

मुंबई : 4 डिसेंबर 2023 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रणबीर कपूरच्या करिअरमधील हा सर्वांधिक आकड्याने ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. ‘ॲनिमल’ या चित्रपटात रणविजय सिंह आणि त्याचे वडील बलबिर सिंह यांच्यातील बिघडलेलं नातं आणि गँगस्टर विश्वाची एक वेगळीच बाजू दाखवली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि अनिल कपूर यांच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होतंय. त्याचसोबत अभिनेता बॉबी देओलने सर्वांचं विशेष लक्ष वेधलंय. यामध्ये त्याने अबरार हक् ही खलनायकी भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटात त्याची भूमिका फारशी मोठी नव्हती. यावर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबीने मौन सोडलं आहे.

“चित्रपटात मी साकारत असलेला अबरार हा सूडासाठी पछाडलेला असतो. त्यामुळे ती भूमिका साकारताना मी माझ्या मनात कोणाचीच छवी निर्माण केली नाही. एखादा रानटी खलनायक कसा असतो, त्या हिशोबाने मी ही भूमिका साकारली. चित्रपटातील माझी भूमिका किती वेळ असेल याचा मी जराही विचार केला नव्हता. कारण भूमिका कितीही वेळाची असली तरी त्यात आपली वेगळी छाप सोडणं महत्त्वाचं असतं”, असं बॉबी म्हणाला. सप्टेंबर महिन्यात जेव्हा ‘ॲनिमल’चा टीझर प्रदर्शित झाला, तेव्हापासून बॉबीच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र त्याला पुरेसा स्क्रीन टाइम मिळाला नसल्याची तक्रार काहींनी केली.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

“भूमिकेची लांबी महत्त्वाची नसते. या चित्रपटातील माझ्या भूमिकेला फार महत्त्व आहे. त्यात माझे आणखी माझे सीन्स असावेत अशी माझीही इच्छा होती. पण जेव्हा मी हा चित्रपट साइन केला होता, तेव्हाच मला स्पष्ट झालं होतं की ही भूमिका एवढीच असणार आहे. पण माझ्या आयुष्यात मला अशा प्रकारची भूमिका साकारायला मिळाली, यासाठी मी देवाचा आभारी आहे. मला फक्त 15 दिवस शूटिंग करावी लागणार आहे आणि संपूर्ण चित्रपटात मी नसेन हे मला माहीत होतं. पण त्यातही लोकांकडून माझ्यावर प्रेमाचा इतका वर्षाव होईल याची मला कल्पना नव्हती. हा खूपच वेगळा अनुभव आहे”, अशा शब्दांत बॉबी व्यक्त झाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.