Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ॲनिमल’मधील झिणझिण्या आणणाऱ्या ‘त्या’ सीनबद्दल अखेर बॉबी देओलने सोडलं मौन

'ॲनिमल' हा चित्रपट जगभरात तब्बल 700 कोटी रुपयांची कमाई करण्याकडे पाऊल टाकत आहे. 3 तास 21 मिनिटांचा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्या भूमिका आहेत.

'ॲनिमल'मधील झिणझिण्या आणणाऱ्या 'त्या' सीनबद्दल अखेर बॉबी देओलने सोडलं मौन
Mansi Taxak, Bobby DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 10:15 AM

मुंबई : 11 डिसेंबर 2023 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्सवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटातील बरेच सीन्स आणि संवाद हे स्त्रीविरोधी असल्याची टीका अनेकांनी केली आहे. यातील अशाच एका वादग्रस्त सीनवर अभिनेता बॉबी देओलने मौन सोडलं आहे. चित्रपटात बॉबीने अबरारची भूमिका साकारली आहे. तिसऱ्या लग्नानंतर पत्नीवर बळजबरी करतानाचा त्याचा हा सीन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या सीनवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अभिनेत्री मानसी तक्षकने बॉबीच्या तिसऱ्या पत्नीची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीत मानसीनेही त्या सीनवर प्रतिक्रिया दिली होती. बॉबीची भूमिकाच तितकी क्रूर होती, म्हणून तो सीन महत्त्वाचा होता, असं ती म्हणाली. आता बॉबीनेही चित्रपटातील ‘मॅरिटल रेप’च्या सीनवर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला बॉबी?

बॉलिवूड बबल या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बॉबी म्हणाला, “चित्रपटात मी एकही शब्द न बोलता माझ्या अभिनयातून बरंच काही सांगू शकत होतो, हे मला भूमिकेविषयी ऐकताच समजलं होतं. किंबहुना तशा व्यक्तीची भूमिका साकारताना माझ्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा होती. माझ्यातला एक वेगळा कलाकार सर्वांसमोर आला. तो सीन शूट करताना माझ्या मनावर कोणतंच दडपण नव्हतं. मी फक्त अशी भूमिका साकारत होतो, जो खरंच खूप वाईट आहे आणि तो त्याच्या पत्नीला तशीच वागणूक देतो. तेच डोक्यात ठेवून मी तो सीन शूट केला होता. ”

हे सुद्धा वाचा

सीनवर मानसीची प्रतिक्रिया

‘ॲनिमल’ या चित्रपटात अबरार हक त्याच्या तिसऱ्या लग्नानंतर पत्नीवर ‘मॅरिटल रेप’ करतो. बॉबीची खलनायकी भूमिका दाखविण्यासाठी तो सीन गरजेचा होता. त्यात कोणत्याही प्रकारे मॅरिटल रेपचं समर्थन केलं गेलं नाही, असं मत मानसीने मांडलं होतं. “तो सीन धक्कादायकच आहे. वैवाहिक आयुष्यात अशी घटना घडावी, अशी कोणाचीच इच्छा नसते. जेव्हा तो सीन सुरू होतो, तेव्हा तुम्ही लाइट्स पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की अत्यंत कलात्मक पद्धतीने तो सीन शूट केला गेलाय. तुम्ही ती म्युझिक ऐकली असेल ती इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली आहे. एक सुंदर शेवट होत असतानाच असं काहीतरी घडतं. यातून प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की ‘ॲनिमल’ येतोय. जर तुम्हाला रणबीरची खतरनाक बाजू दिसली, तर खलनायक त्यापेक्षाही वाईट असला पाहिजे. बॉबी सरांची भूमिकाच तशी होती आणि आम्हाला पडद्यावर जो ‘ॲनिमल’ दाखवायचा होता, तो त्या सीनद्वारे दाखवता आला”, असं ती म्हणाली होती.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.