Bobby Deol | ‘थेट झोपेतून उठून आला’, मेहंदी कार्यक्रमातील अजब गजब कपड्यांवरून बॉबी देओल ट्रोल

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे लग्नबंधनात अडकणार असून नुकताच तिचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने पत्नी तान्यासोबत हजेरी लावली. यावेळी त्याचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलंय.

Bobby Deol | 'थेट झोपेतून उठून आला', मेहंदी कार्यक्रमातील अजब गजब कपड्यांवरून बॉबी देओल ट्रोल
Bobby DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 3:47 PM

मुंबई : अभिनेते चंकी पांडे यांचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी म्हणजेच अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण अलाना पांडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रे याच्यासोबत ती लग्न करणार आहे. नुकताच अलानाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी अभिनेता बॉबी देओल पत्नी तान्यासोबत पोहोचला होता. तान्या देओलने यावेळी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र मेहंदी कार्यक्रमाला पोहोचलेल्या बॉबी देओलचे कपडे पाहून सगळेच चकीत झाले. इतकंच नव्हे तर त्याच्या ड्रेसिंग स्टाइलवरून नेटकरी त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.

पापाराझी अकाऊंटवर बॉबीचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे तान्याने सुंदर ड्रेस घातला होता. तर दुसरीकडे बॉबी टी-शर्ट आणि पायजमामध्ये मेहंदी कार्यक्रमाला पोहोचला होता. ‘पती नेहमीच अंडर ड्रेस्ड का असतात’, असा सवाल एका युजरने केला. तर ‘थेट झोपेतून उठून आला आहे वाटतं’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘जेव्हा पजामा पार्टी आणि मेहंदी फंक्शन एकत्रच असतात’, असा उपरोधिक टोलाही नेटकऱ्यांनी लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

अनन्याची बहीण अलाना ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यावर तिने दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचा होणारा पती आयव्हर मॅक्रे हा दिग्दर्शक आहे. हे दोघं गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे अभिनेता, निर्माता सोहैल खानच्या घरी हा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. चिक्की पांडे आणि सोहैल खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत, असं म्हटलं जातं. त्यामुळे सोहैलच्या घरी मेहंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बॉबी देओल नुकताच ‘आश्रम 3’ या वेब सीरिजमध्ये झळकला. या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये बॉबीसोबतच इशा गुप्ता, चंदन रॉय सन्याल, अनुप्रिया गोयंका, श्रिधा चौधरी, तुषाप पांडे यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रकाश झा दिग्दर्शित या वेब सीरिजवर अनेक आरोपही झाले होते. हिंदू धर्मीयांना यामध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. इतकंच नव्हे तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून गेल्या वर्षी भोपाळमधील या सीरिजच्या सेटवर तोडफोडसुद्धा करण्यात आली होती.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...