Akshay Kumar | ‘मिशन रानीगंज’ फ्लाॅप गेल्यानंतर अक्षय कुमार याची मोठी घोषणा, थेट म्हणाला, तुमच्या…
अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद हा अक्षय कुमार याच्या चित्रपटांना मिळताना दिसत नाहीये.
मुंबई : बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात आपला सर्वांचा आवडचा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमार हा बाॅलिवूडचा असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट (Movie) हे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमार याचे सध्या एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, अक्षय कुमार याच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे बघायला मिळतंय. अक्षयचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अक्षय कुमार हा दिसला. मात्र, असे असूनही तो चित्रपट फ्लाॅप गेला. फक्त सेल्फी हाच चित्रपट नव्हे तर अक्षय कुमार याचे सतत चित्रपट फ्लाॅप जात आहेत.
अक्षय कुमार याचे काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेले ओएमजी 2 आणि मिशन रानीगंज हे देखील चित्रपट फ्लाॅप गेले. मात्र, सतत चित्रपट फ्लाॅप जात असताना देखील अक्षय कुमार याने हार मानली नसल्याचे स्पष्ट दिसतंय. कारण आता नुकताच अक्षय कुमार याने आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग ही सुरू केलीये.
View this post on Instagram
अक्षय कुमार याने आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग लंडन येथे सुरू केलीये. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अक्षय कुमार याने खेल खेल में या चित्रपटाची शूटिंग सुरू केलीये. चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करत अक्षय कुमार याने अत्यंत खास कॅप्शन देखील शेअर केले आहे.
अक्षय कुमार याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, कॅमेरा सुरू झाला की, मी हसण्याशिवाय काहीच करू शकत नाही. खेल खेल मेंचे शूटिंग सुरू झाले आहे. तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. आता अक्षय कुमार याच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अक्षय कुमार याच्यासह चित्रपट निर्मात्यांना देखील आगामी चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.