अनेकवेळा मी भांडी घासतो, अमिताभ बच्चन यांचा अत्यंत मोठा खुलासा

अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ गाजवलाय. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय देखील असतात. चाहत्यांसाठी फोटोही शेअर करताना दिसतात.

अनेकवेळा मी भांडी घासतो, अमिताभ बच्चन यांचा अत्यंत मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 2:17 PM

मुंबई : अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. नुकताच अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अत्यंत मोठा खुलासा हा केलाय. कौन बनेगा करोडपती 15 च्या मंचावर गुजरात येथील हर्ष शाह हा पोहचला. यावेळी हर्ष याने थेट अमिताभ बच्चन यांनाच मोठा सवाल केला. विशेष म्हणजे हर्ष शाह याच्या प्रश्नानंतर अमिताभ बच्चन यांनी हैराण करणारा खुलासा केला.

अमिताभ बच्चन यांना हर्ष शाह याने थेट विचारले की, तुम्ही कधी तुमच्या घरी भांडी घासली आहेत का? यावर अमिताभ बच्चन हे अगोदर हसायला लागले आणि त्यांनी थेट म्हटले की, होय…एकदा नाही तर खूप वेळा मी घरी भांडी किचनमध्ये जाऊन साफ केली आहेत. फक्त भांडीच नाही तर किचनमधील इतरही कामे मी केलेली आहेत.

पुढे अमिताभ बच्चन म्हणाले की, किचनमधील सिंक देखील मी अनेकदा धुतले आहे. अमिताभ बच्चन यांचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे देखील बघायला मिळत आहे. म्हणजेच काय तर बॅलिवूडचे बादशाह देखील किचनमध्ये काम करतात. अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर नेहमीच मोठे खुलासे करताना दिसतात.

काही दिवसांपूर्वीच कौन बनेगा करोडपती 15 च्या मंचावरून अमिताभ बच्चन यांनी थेट प्राजक्ता माळी हिला व्हिडीओ काॅल केला. प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहता हा अमिताभ बच्चन यांच्यासमोर होता. यावेळी तो गेम खेळताना अनेकदा प्राजक्ता माळी हिच्या नावाचा उल्लेख करताना दिसला. त्याला सरप्राईज देण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी थेट प्राजक्ता माळी हिलाच व्हिडीओ काॅल केला.

विशेष म्हणजे याचा व्हिडीओ स्वत: प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी प्राजक्ता माळी ही अमिताभ बच्चन आणि त्या स्पर्धकासोबत बऱ्याच वेळ गप्पा मारत बसली होती. इतकेच नाही तर प्राजक्ता माळी हिने थेट म्हटले होते की, तू कौन बनेगा करोडपती 15 जिंक, मी स्वत: तुला भेटण्यासाठी येईल. याचेच अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.