Dharmendra | ‘मी ती चूक केलीच नसती तर…’, वयाच्या ८७ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी सांगितलं पश्चातापाचं कारण

तरुणपणी केलेल्या चुकांचा धर्मेंद्र यांना वयाच्या ८७ व्या वर्षी होतोय पश्चाताप.. अखेर इतरे वर्ष मनात लपवलेलं गुपित त्यांनी बोलून दाखवलंच...

Dharmendra | 'मी ती चूक केलीच नसती तर...', वयाच्या ८७ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी सांगितलं पश्चातापाचं कारण
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 1:03 PM

मुंबई | ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘लोहा’, ‘अपने’, ‘आखे’, ‘खतरो के खिलाडी’, ‘आलिबाबा ४० चोर’, ‘यादो की बारात’, ‘गझब’, ‘तहलका’, ‘फूल और पत्थर’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारात अभिनेते धर्मेंद्र यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केल. धर्मेंद्र स्टारर ‘यमला पगला दिवाना’ सिनेमाने तर तरुणीईला वेड लावलं. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये धर्मेंद्र यांची गाजलेली गाणी वाजतात. एवढंच नाही तर, धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. धर्मेंद्र यांच्याबद्दल कायम कोणती न कोणती महत्त्वाची गोष्ट चाहत्यांच्या समोर येत. ज्यामुळे धर्मेंद्र यांची खासगी आणि प्रोफेशल लाईफ पुन्हा चर्चेत येते. आता तर धर्मेंद्र यांनी मोठा खुलासा केला.

तरुणपणात केलेल्या चुकांचा पश्चाताप धर्मेंद्र यांना वयाच्या ८७ व्या वर्षी होत आहे. सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे. आज धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये जे स्थान पक्क केलं आहे, त्याचा विचार देखील अभिनेत्याने कधी केला नव्हता. फक्त राहण्यासाठी एक घर आणि कार एवढीत अपेक्षा धर्मेंद्र यांनी केली होती.

धर्मेंद्र यांच्याकडे आजच्या स्थितीत, पैसा, प्रसिद्धी सर्व काही आहे, पण एक गोष्ट अशी आहे, ज्याचा धर्मेंद्र यांना आजही पश्चाताप होत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र म्हणाले, ‘उत्तम सिनेमांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली असती, तर आणखी उत्साहाने काम केलं असतं…’ पुढे धर्मेंद्र यांनी मोठा खुलासा केला आहे.

हे सुद्धा वाचा

धर्मेंद्र म्हणाले, ‘आता जेव्हा मी माझा भूतकाळ पाहतो, तर असं वाटतं तेव्हा मी त्या चुका केल्या नसत्या तर… कमी पण दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं असतं तर.. पण मी माझं आयुष्य पुन्हा जगू शकत नाही..’ महत्त्वाचं म्हणजे वयाच्या ८७ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी एक भीती सतावत आहे. ज्यामुळे ते आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत..

‘चाहत्यांचं माझ्यावर प्रेम कमा व्हायला नको म्हणून मी आजही काम करत आहे. भूमी आणि चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मी आजही काम करत आहे.’ असं देखील धर्मेंद्र म्हणाले… सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची तुफान चर्चा रंगत आहे.

धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेते लवकरच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात धर्मेंद्र यांच्या शिवाय, जया बच्चन, शबाना अझमी, रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे..

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.