Govinda जेव्हा रात्रीत झाला मालामाल; पैशांनी भरलं घर, अकाऊंट… म्हणाला, ‘शंभर ट्रक…’

गरिबी अनुभवलेला गोविंदा एका रात्रीत कसा झाला मालामाल, घरात आणि अकाऊंटमध्ये बक्कळ पैशांचं करायचं तरी काय? असा अभिनेत्याला पडला प्रश्न आणि...

Govinda जेव्हा रात्रीत झाला मालामाल; पैशांनी भरलं घर, अकाऊंट... म्हणाला, 'शंभर ट्रक...'
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 10:32 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत, ज्यांनी आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला. एवढंच नाही तर, झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी बऱ्याचवेळा खस्ता खाल्ला. करियरच्या शिखरावर चढत असताना अपयशाचा देखील सामना केला, पण कधीही मागे वळून पाहिलं नाही. अशाचं अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे गोविंदा. गोविंदा आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसला तरी अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. आजही अनेकदा महत्त्वाच्या ठिकाणी किंवा कार्यक्रमांमध्ये गोविंदाची एक झलक चाहत्यांना पाहता येते. गोविंदाकडे आज संपत्ती, प्रसिद्धी सर्व काही आहे, पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्याने गरिबी अनुभवलेली आहे.

गोविंदा ९० च्या दशकाची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. ही गोष्ट अभिनेत्याच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. शिवाय गोविंदाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा निर्माते आणि दिग्दर्शक यांनी गोविंदाच्या घराबाहेर रांग लावली. एकाच वेळी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्यासाठी अनेक ऑफर आल्या आणि एका रात्रीत अभिनेता मालामाल झाला.

गोविंदाने एका चॅट शोमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. ‘आमचं लाहनपण प्रचंड गरिबीत गेलं. आम्हाला इतक्या पैशांची सवय नव्हती. एका रात्री मी माझ्या भावाला बोलावलं आणि त्याला पैसे आणि सर्व अकाऊंड दाखवले. इतके पैसे पाहून आम्ही प्रचंड आनंदी झालो..’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘बक्कळ पैसे आले, पण त्या पैशांचं काय करायचं हे आम्हाला माहिती नव्हतं. कोणालाच काहीच कल्पना नव्हती की, कमावलेल्या पैशांचं काय करणार… ‘ अखेर गोविंदाला एक विचार आला आणि त्या पैशांचं काय करयाचं हे अभिनेत्याने भावाला सांगितलं.

अभिनेत्याने भावाला सांगितलं, ‘पप्पू… चल आपण १०० रिक्षा खरेदी करू.’ पण अभिनेत्याच्या भावाने यासाठी नकार दिला आणि म्हणाला, ‘हा आपल्या योग्यतेचा व्यवसाय नाही…’ काही वर्षांनंतर अभिनेता प्रचंड श्रीमंत झाला. ‘सुरुवाती पासून आपण गरिबी पाहिली आहे, आता उंच उजडण्याची गरज आहे…’ असं गोविंदाचा भाऊ म्हणाला…

कोणत्याही सिनेमाला नकार देवू नको असा सल्ला गोविंदाच्या भावाने दिला. पण कालांतराने काही सिनेमांना नकार द्यावा लागला, कारण वेळ नव्हता. अभिनेत्याला सिनेमे मिळत होते, पैसे वाढत होते… तरी देखील एवढ्या पैशांचं काय करायचं? हे अद्यापही अभिनेता आणि कुटुंबाला कळालं नव्हतं.

गोविंदा म्हणाला, ‘पप्पू चल १०० ट्रक खरेदी करू…’ पण यासाठी देखील अभिनेत्याच्या भावाने नकार दिला. अभिनेता म्हणाला, ‘तेव्हा एका वर्षात १० सिनेमे करायचो. सर्व सिनेमांना यश मिळत नव्हतं. पण लोकप्रियता वाढत होती. मला काम आणि पैशांची कोणतीही कमी भासत नव्हती…’ असं देखील अभिनेता म्हणाला…

एका काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अभिनेता गोविंदा, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या अभिनेत्यांचं राज्य होतं. आता बॉलिवूडमध्ये अनेक नवीन अभिनेत्यांनी पदार्पण केलं असलं तरी, ९० च्या दशकातील अभिनेत्यांची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अभिनेता गोविंदा आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसला तरी, त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.