Viral Video: सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनला जॅकी श्रॉफ यांच्याकडून मारहाण? चाहत्यांमध्ये संताप

Jackie Shroff | 'जॅकी श्रॉफ कधीच कोणाचा आदर...', जॅकी श्रॉफ यांच्याकडून चाहत्याला मारहाण? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॅती श्रॉफ यांच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा... व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त

Viral Video:  सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅनला जॅकी श्रॉफ यांच्याकडून मारहाण? चाहत्यांमध्ये संताप
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 1:25 PM

अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील जॅकी श्रॉफ यांच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. जॅकी श्रॉफ यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता देखील जॅकी श्रॉफ यांना पाहिल्यानंतर त्यांच्या भोवती चाहत्यांची गर्दी जमली. काही चाहत्यांनी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण जॅकी श्रॉफ यांनी चाहत्यांना मारहाण केल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ यांचा चाहत्यांसोबत एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ यांनी चाहत्यांना दिलेली वागणूक अनेकांना आवडलेली नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ यांच्या भोवती अनेक चाहते दिसत आहेत. तर जॅकी श्रॉफ यांच्या हातात लहान रोपटी दिसत आहेत. अशात जॅकी श्रॉफ यांना पाहिल्यानंतर चाहत्यांची मोठी गर्दी जमते.

दरम्यान, सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्यांच्या डोक्यात जॅकी श्रॉफ जोरदार मारताना दिसत आहेत… सांगायचं झालं तर, व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या खास आणि विनोदी अंदाजात चाहत्यांची भेट घेतली, तर जॅकी श्रॉफ यांची चाहत्यांसोबत वागणूक योग्य नव्हती… असं देखील चाहते व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॅकी श्रॉफ यांच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘त्याला का मारत आहात, पागल आहात का?’ दुसरी नेटकरी म्हणाला, ‘याला स्टाईल नाही तर, हात साफ करणं म्हणतात…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘जॅकी श्रॉफ यांची वागणूक योग्य नाही. त्यांनी चाहत्यांसबोत असं वागायला नको…’ असं देखील नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणत आहेत.

सांगायचं झालं तर, अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गेल्या 40 पेक्षा अधिक वर्षांपासून जॅकी श्रॉफ बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. जॅकी श्रॉफ यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि बॉलिवूडवर आणि चाहत्यांच्या मनावर त्यांनी राज्य केलं.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.