Parineet Chopra | ‘गरीब नेता लग्नात कोट्यवधी खर्च करतो म्हणजे…’, राघव चड्ढा यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह
Parineet Chopra | राघव चड्ढा यांच्या संपत्तीबद्दल सर्वत्र चर्चा... निवडणुकीच्या वेळी राघव चड्ढा यांनी संपत्तीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त परिस्थिती...; परिणीती चोप्रा हिच्यासोबत लग्न केल्यानंतर राघव चड्ढा यांच्या संपत्तीच्या चर्चांना उधाण..प्रसिद्ध अभिनेत्याच्या ट्विटनंतर खळबळ
मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने पती राघव चड्ढा यांनी २४ सप्टेंबर २०२३ नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या थाटात राघव आणि परिणीती यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं आहे. सध्या सर्वत्र राघव आणि परिणीती यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. लग्नानंतर खुद्द परिणीती आणि राघव यांनी लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. राघव – परिणीती यांच्या लग्नात अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाही थाटात परिणीती आणि राघव यांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या शाही विवाहाची चर्चा रंगली आहे. अनेक महागड्या वस्तू आणि फुलांनी परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचं ठिकाण सजवण्यात आलं होतं. लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर राघव चड्ढा यांच्या संपत्तीबद्दल सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. अशात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या ट्विटनंतर राघव चड्ढा यांच्याबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे.
राघव चड्डा ने चुनाव लड़ते समय कहा था कि उनकी कुल संपत्ति 50 से 70 लाख रुपए की है! इतने “गरीब नेता” ने अपनी शादी पर करोडो रुपए कहाँ से खर्च किए हैं! क्या @dir_ed @IncomeTaxIndia इसका हिसाब माँग पायेंगे? माँगना तो चाहिए!
— KRK (@kamaalrkhan) September 25, 2023
अभिनेता आणि सिनेविश्लेषक कमाल राशिद खान उर्फ केआरके यांने राघव चड्ढा यांच्याबद्दल एक ट्विट केलं आहे. ट्विट करत अभिनेता म्हणाला, ‘निवडणूक लढवताना माझ्याकडे ५० ते ७० लाख रुपयांची संपत्ती आहे, असं राघव चड्ढा म्हणाले होते! एवढ्या गरीब नेत्याने लग्नात कोट्यवधी रुपये कसे खर्च केले! आयकर विभाग याचा हिशेब मागू शकतात! मागायला तर हवा..!’ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र केआरके याने केलेलं ट्विट व्हायरल होत आहे.
राघव चड्ढा – परिणीती चोप्रा यांची नेटवर्थ
निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार राघव चड्ढा यांच्याकडे एकूण ५० लाख रुपयांची संपत्ती असून, त्यांच्याकडे ३७ लाख रुपये इतर संपत्ती आहे. राघव चड्ढा यांच्याकडे मारुती स्विप्ट कार आहे. याशिवाय त्यांच्याकडे ९० ग्रॅम सोनं आहे. ज्याची किंमत जवळपास ४ लाख रुपये आहे.
परिणीती चोप्रा यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, परिणीती हिच्याकडे जवळपास ६० कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेत्री प्रत्येक सिनेमासाठी ४ ते ६ कोटी रुपये मानधन घेते. अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. अभिनेत्रीकडे Audi A-6, Jaguar XJL, Audi Q-5 सारख्या लक्झरी कार आहेत.