नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मोठ्या भावाला अटक, प्रकरण जाणून व्हाल थक्क
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मोठ्या भावाला धक्कादायक प्रकरणात अटक, याआधी देखील करण्यात आली होती अटक, प्रकरण जाणून व्हाल थक्क... नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाच्या अडचणीत मोठी वाढ
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पत्नी आलिया हिच्यासोबत असलेल्या भांडणामुळे चर्चेत होता. पण आता नवाजुद्दीन सिद्दीकी पत्नी आलिया हिच्यामुळे नाहीतर, मोठ्या भावामुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मोठ्या भावाचं नाव अयाजुद्दीन असं आहे. अयाझुद्दीनला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खोटारडेपणाचा गंभीर आरोप आहे.
सांगायचं झालं तर, . नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा भाऊ अयाझुद्दीनला अटक करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील अयाझुद्दीनला अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील पोलिसांनी बनावट अयाझुद्दीनला प्रकरणात अटक केली आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा भाऊ अयाजुद्दीनला मुझफ्फरनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. संबंधीत प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पोलिसांनी अधिक तपास सुरू केला.
तक्रारीत म्हटले आहे की, अयाजुद्दीनचा जावेद इक्बालसोबत 12 डिसेंबर 2023 रोजी शेतजमिनीवरून वाद झाला होता. याबाबत त्यांनी अर्जही दिला होता. ज्यामध्ये वाद त्यांच्या बाजूने मिटल्याचा दावा करण्यात आला होता. 8 डिसेंबर 2023 रोजी अयाजुद्दीन याने डीएम कोर्टाकडून हे आदेश जारी करण्यात आल्याचं सांगितलं. त्यानंतर संशय आल्याने चौकशी सुरु झाली.
पण डीएम कोर्टाकडून असा कोणताही आदेश जारी करण्यात आला नसल्याचे सत्य समोर आलं आहे. अभिनेत्याच्या भावाने बनावट पत्र देऊन विभागाची दिशाभूल केल्याटी माहिती समोर आली. अखेर सत्य समोर आल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.