Alia Bhatt सोबत लग्न केल्याचा रणबीर कपूर याला होतोय पश्चात्ताप, ‘या’ अभिनेत्रीवर त्याचं खरं प्रेम?

Alia Bhatt | 'ती आता तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे...', आलिया भट्ट नाही तर, 'या' अभिनेत्रीसोबत रणबीर कपूर याला करायचं होतं... अखेर अभिनेता व्यक्त झालाच... सध्या सर्वत्र रणबीर कपूर याच्या वक्तव्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत... असं का म्हणाला अभिनेता?

Alia Bhatt सोबत लग्न केल्याचा रणबीर कपूर याला होतोय पश्चात्ताप,  'या' अभिनेत्रीवर त्याचं खरं प्रेम?
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 12:25 PM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेता रणबीर कपूर याने गेल्या वर्षी अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया आणि रणबीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आलिया आणि रणबीर कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण लग्नाच्या एक वर्षांनंतर अभिनेत्रीने खंत व्यक्त केली आहे. रणबीर कपूर याला अभिनेत्री आलिया भट्ट नाही तर,बॉलिवूडच्या अन्य प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होचं. सध्या रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर कपूर याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, लवकरच दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याचा ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) शो चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. करण याच्या शोचा आठवा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, शोचे प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शोमध्ये रणबीर कपूर अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत उपस्थित राहणार आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये करण, रणबीर याच्यासोबत रॉपिड फायर राऊंड खेळताना दिसत आहे. करण पहिला प्रश्न विचारतो, ‘खरं बोलण्याचं औषध कोणाला द्यायचं असेल तर कोणाला देशील…’ यावर अभिनेत्याने रणवीर सिंग याचं नाव घेतलं आणि म्हणाला, ‘तुला रणबीर कपूर आवडतो?…’

पुढे करण, रणबीर याला विचारतो, ‘तुला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न आणि हुकअप करायला आवडेल…’ यासाठी करण अभिनेत्या तीन बॉलिवूड अभिनेत्रींची नावे सांगतो. ‘अनुष्का शर्मा, आलिया भट्ट आणि जॅकलीन फर्नांडिस..’ या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणतो, ‘अनुष्का हिच्यासोबत लग्न करायला आवडलं असतं. पण तिचं लग्न झालं आहे आणि ती तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. इतर दोघींसोबत मला हुकअप करायला आवडेल…’ सध्या सर्वत्र रणबीर कपूर याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

रणबीर कपूर याचा आगामी सिनेमा, रणबीर कपूर लवकरच ऍनिमल सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अभिनेत्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमा १ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.