Mahadev Betting App | संजय दत्त पुन्हा मोठ्या प्रकरणात अडकणार? ईडीकडून होणार कसून चौकशी
Mahadev Betting App | ईडीच्या रडारवर ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं, लवकरच होणार चौकशी... महादेव बेटिंग ॲपच्या सक्सेस पार्टीत सिनेतारकांची हजेरी.. महादेव बेटिंग ॲप संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी कसून चौकशी करत... प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ
मुंबई | 07 सप्टेंबर 2023 | महादेव बेटिंग ॲप संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. महादेव बेटिंग ॲपच्या सक्सेस पार्टीत सिनेतारकांनी हजेरी लावली होती. याप्रककरणी ३४ सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. म्हणून याप्रकरणी आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय दत्त, सुनिल शेट्टी, रणबीर कपूर, कपिल शर्मा, श्रद्धा कपूर यांची नावे समोर आली आहेत. दरम्यान, सर्व सेलिब्रिटींची ईडीकडून कसून चौकशी होणार आहे. सध्या सर्वत्र महादेव बेटिंग ॲपची चर्चा रंगली आहे. या प्रकरणी संजय दत्त याचं देखील नाव समोर आल्यामुळे सर्वत्र खळबल माजली आहे.
संजय दत्त याआधी देखील अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता अभिनेत्याच्या चौकशीनंतर कोणती गोष्ट समोर येईल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ड्रग्ज प्रकरण, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोपांमुळे संजय दत्त तुरुंगात शिक्षा भोगत होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेता आनंदाने आयुष्य जगत होता. पण आता पुन्हा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजूबाबा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
सौरभ याने मित्र रवी उप्पल याच्यासोबत ‘ महादेव बेटिंग ॲप’ची सुरुवात केली. महादेव बेटिंग ॲप मिळत असलेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी एक दोन कोटी नाही तर, तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अडकलेल्या सर्व सेलिब्रिटींची ईडीकडून चौकशी होणार आहे. रफ्तार, एम्सी दिप्ती साधवानी, सुनील शेट्टी, सोनू सूद, संजय दत्त, हार्डी संधू, सुनिल ग्रोव्हर, सोनाक्षी सिन्हा, रश्मिका मंधाना, सारा अली खान, गुरु रंधावा, टायगर श्रॉफ, कपिल शर्मा, नुसरत बरुचा, मलायका अरोरा, नोरा फतेही, रणबीर कपूर.. यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत.
सेलिब्रिटींना विचारण्यात येणार असे प्रश्न
रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, हिना खान, हुमा कुरेशी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी फेअरप्ले अॅपसाठी जाहिराती केल्या होत्या. या जाहिरातीसाठी त्यांनी कोणत्या कंपनीशी करार केला होता? त्यांची फी कोणत्या पद्धतीने दिली गेली? रोख की चेक? सौरभ चंद्राकर, रवी उप्पल किंवा ॲप संबंधित व्यक्तींसोबत ओळख कशी झाली? हे सर्व प्रश्न ईडी सेलिब्रिटींना विचारणार असल्याची चर्चा रंगली आहे.