Sanjay Dutt याची तुरुंगात फक्त लव्हस्टोरीच रंगली नाही तर; चार भिंतीमध्ये संजूबाबाने केली ‘ही’ गोष्ट

तुरुंगातील 'तो' खास अनुभव खुद्द संजय दत्त याने सांगितलाच... तुरुंगात फक्त अभिनेत्याची 'लव्हस्टोरी'च रंगली नाही तर, 'या' गोष्टीचा देखील संजूबाबाने सोडला नाही नाद

Sanjay Dutt याची तुरुंगात फक्त लव्हस्टोरीच रंगली नाही तर; चार भिंतीमध्ये संजूबाबाने केली 'ही' गोष्ट
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 12:54 PM

मुंबई : अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. वयाच्या ६३ व्या वर्षी देखील अभिनेता प्रचंड फिट दिसतो. या वयात देखील संजय रोज व्यायाम करत असतो. शिवाय अभिनेता चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असतो. महत्त्वाचं म्हणजे, संजूबाबा त्याच्या फिटनेस आणि अफेअर्समुळे कायम चर्चेत असतो. आतापर्यंत अभिनेत्याचं अनेक महिलांसोबत नाव जोडण्यात आलं. एवढंच नाही तर, अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत देखील अभिनेत्याचं नाव जोडण्यात आलं. अभिनेत्याच्या पहिली पत्नी रिचा शर्मा हिच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण अभिनेत्याची दुसरी पत्नी रिया पिल्लाई (rhea pillai) यांच्या नात्याबद्दल देखील फार चर्चा रंगल्या. त्यानंतर संजय आणि रिया यांनी १४ फेब्रुवारी रोजी लग्न केलं.

संजय दत्त तुरुंगात असाताना देखील रिया पिल्लाई हिने अभिनेत्याची साथ सोडली नाही. अखेर संजूबाबा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दोघांनी लग्न केल्याच्या देखील तुफान रंगल्या. पण आता खुद्द अभिनेत्याने तुरुंगात करत असलेल्या एका गोष्टीबद्दल मोठा खुलासा केला आहे… संजय तुरुंगात असताना देखील फिट राहण्यासाठी अनेक प्रयत्न करत होता. अभिनेता सतत व्यायाम करायचा.

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. संजूबाबा म्हणाला, ‘काही खास गोष्टींचा जुगाड करून मी तुरुंगात फिट राहण्याचा प्रयत्न केला. तुरुंगात माझा दिवस सकाळी सहा वाजता सुरु व्हायचा. सुरुवातीला मला सतत कुटुंबाची आणि मुलांची आठवण यायची मी सतत रडायचो… पण तेव्हा मी स्वतःला समजावलं आणि सकारात्मक राहण्याचा निर्णय घेतला… मी तुरुंगात चार भिंतींमध्ये वर्कआऊट करण्यास सुरुवात केली…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘सुरक्षेच्या कारणामुळे मी तुरुंगात एकटा होतो. त्यामुळे मी पळण्यास सुरुवात केली. मी रोज फ्री-हँड एक्सरसाइज करायचो… एक्सरसाइज झाल्यानंतर मी पूजा करायचो. मी तुरुंगात शिव पुराण आणि गणेश पुराण वाचण्यास सुरुवात केली. मी कारागृह अधिकाऱ्यांकडून काही वजन मागितले… पण मला मिळाले नाही…’

‘अशात ज्या कॅनमधून मला जेवण यायचं त्याच कॅनमध्ये पाणी भरुन त्याचा डंबल म्हणून वापर करायचो… मी बेडशीट वापरून आयसोमेट्रिक करायचो. मी फ्रीहँड करायचो आणि भरपूर लाकडी बीन्सवर बॉक्सिंग करायचो.’ अशा प्रकारे तरुंगात राहून फक्त अभिनेत्याचं प्रेम बहरलं नाही तर, संजूबाबाने स्वतःच्या फिटनेसकडे देखील योग्य लक्ष दिलं..

संजूबाबाच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच अभिनेता अर्शद वारसी याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे. पण सिनेमाचं शिर्षक अद्याप ठरलेलं नाही.

'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.