Satish Kaushik : सावळ्या रंगामुळे अभिनेत्याला नाही मिळालं काम, अखेर घेतला मोठा निर्णय

वर्णभेदाचे शिकार? मेरीट असूनही केवळ सावळ्या रंगामुळे सतिश कौशिक यांना सिनेमा मिळेनात; अखेर 'त्या' मोठ्या निर्णयानंतर मिळाली भूमिका

Satish Kaushik : सावळ्या रंगामुळे अभिनेत्याला नाही मिळालं काम, अखेर घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 2:24 PM

Satish Kaushik : होळी सणाचा आनंद प्रत्येकाने लुटला असेलच. पण होळी साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चाहत्यांना वाईट बातमी मिळाली. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.अभिनेते, विनोदी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते… या सर्वच क्षेत्रात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सतीश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण सतीश कौशिक यांना सुरुवातीला अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना करावा लागला.

सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९६७ साली हरियाणा याठिकाणी झाला. NSD (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) आणि FTII (फिल्म एन्ड टेलीव्हीजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया) मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. अभिनय क्षेत्रात सतीश यांनी पदार्पण केलं. पण त्याआधी त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात स्वतःचं नशीब आजमावलं.

सतीश कौशिक यांना ‘मिस्टर इंडिया’, ‘साजन चले ससुराल’, ‘दिवाना मस्ताना’ यांसारख्या अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास फार कठीण होता. सावळ्या रंगामुळे अनेकांनी सतीश कौशिक यांना सिनेमात भूमिका देण्यासाठी नकार दिला. अशात सतीश कौशिक त्रासले होते.

हे सुद्धा वाचा

अखेर सतत मिळाणाऱ्या नकाराला कंटाळून सतीश कौशिक यांनी मोठा निर्णय घेतला. सतीश कौशिक यांनी श्याम बेनेगल यांच्या ‘मंडी’ सिनेमासाठी स्वतःचे एक्स-रे दिले. एक्स-रे देत श्याम बेनेगल यांना कौशिक म्हणाले, ‘माझं मन आतून फार चांगलं आहे…’, सतीश कौशिक यांची ही गोष्ट श्याम बेनेगल यांना प्रचंड आवडली आणि त्यांनी सतीश यांना सिनेमात भूमिका दिली.

त्यानंतर सतीश यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ज्याप्रमाणे सतीश यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं, त्यांचप्रमाणे कुटुंबियांसाठी देखील सतीश कौशिक फार खास होते. सतीश कौशिक यांच्या भाचीने सांगितलं की, ‘ते जेव्हाही दिल्लीमध्ये यायचे तेव्हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला भेटून जायचे. त्यांच्याकडे फार वेळा नसायचा, त्यामुळे एका वेळीच सर्वांची भेट घेण्यासाठी सतीश कौशिक कायम उत्सुक असायचे…’

सतीश कौशिक पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका कौशिक यांना सोडून गेले आहेत. पण कुटुंबासाठी सतीश कौशिक यांनी कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये इकती आहे. अभिनयातून सतीश कौशिक यांनी कोट्यवधींचं संपत्ती कमावली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.