Sameer Wankhede | ‘श्रीमंत होण्यासाठी समीर वानखेडेंनी आर्यन खानला केली अटक’; अभिनेत्याची टीका
आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर आहे. जवळपास एक वर्षानंतर वानखेडेंवर कारवाई होत आहे. याप्रकरणी आता एका बॉलिवूड अभिनेत्याने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी अटक करणारे एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे आता स्वत: अडचणीत सापडले आहेत. वानखेडेंविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांच्या घरावर छापेसुद्धा टाकण्यात आले आहेत. आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर आहे. जवळपास एक वर्षानंतर वानखेडेंवर कारवाई होत आहे. याप्रकरणी आता एका बॉलिवूड अभिनेत्याने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
समीर वानखेडे यांच्यावरील आरोप
‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील छाप्यादरम्यान आर्यनला वाचवण्यासाठी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीच्या पथकाने त्याच्या कुटुंबीयांकडे 25 कोटींची लाच मागून 18 कोटी रुपयांवर डीलची तयारी दाखवली होती. आर्यनाच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागणारा खासगी पंच के. पी. गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचं खोटं चित्रही वानखेडेंच्या पथकाने उभं केलं होतं. तसंच 17 जणांची नावं संशयित म्हणून वगळून त्यांना सोडण्याची परवानगी दिली होती. त्यात एका कथित ड्रग्ज विक्रेत्याचा समावेश होता, असा ठपका एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.
USA ambassador in India himself goes to #SRK house to meet him. This is the Jalwa of SRK in today’s world. But Sameer Wankhede forgot this before to arrest #AryanKhan to become rich.
— KRK (@kamaalrkhan) May 17, 2023
अभिनेत्याचं ट्विट-
वानखेडेंवर निशाणा साधणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर. खान आहे. केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये लिहिलंय, ‘भारतातील अमेरिकेचे राजदूत स्वत: शाहरुख खानच्या घरी भेटायला गेले आहेत. आजच्या जगात शाहरुखचा असा जलवा आहे. पण श्रीमंत होण्यासाठी आर्यन खानला अटक करण्यापूर्वी समीर वानखेडे ही गोष्ट विसरले होते.’ या ट्विटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘असं वाटतंय शाहरुख खानने तुला पीआर हेड म्हणून ठेवलंय. तू खूप चांगलं काम करतोयस’, असं एकाने लिहिलंय. तर ‘तू अजूनही भारतात आहेस. समीर समीर बोलू नकोस, अन्यथा ईडीवाले तुलाही आमंत्रण देतील’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
वानखेडेंच्या पत्नीची प्रतिक्रिया
“त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करतोय”, असं समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर म्हणाली. तर दुसरीकडे देशभक्त असल्याचं बक्षीस मिळत असल्याची प्रतिक्रिया वानखेडेंनी शनिवारी दिली आहे.