Shah Rukh Khan | वयाच्या २१ व्या वर्षी किंग खानच्या लेकीला महागड्या गाड्यांचा शोक, सुहाना कोट्यवधींची मालकीण
परदेशात आहे किंग खान याच्या लेकीचं भव्य घर; सुहानाकडे महागड्या कारचं कलेक्शन... रॉयल आयुष्य जगते शाहरुख खान याची लेक सुहाना खान
मुंबई : अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहरुख त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. किंग खान कधी पत्नी गौरी खान हिच्याबद्दल सांगतो, तर कधी मुलांबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत मनमोकळेपणाने शेअर करतो. शाहरुख याची मुलांनी अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर कायम किंग खान याच्या मुलांची चर्चा रंगत असते. शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान हिची लोकप्रियता देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर, वयाच्या २१ व्या वर्षी सुहाना कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. सध्या सर्वत्र सुहाना खान हिच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे.
सुहाना हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी, तिची लोकप्रियता दूरपर्यंत पोहोचली आहे. सुहानाची फॅन फॉलोइंग देखील फार तगडी आहे. शाहरुख खान याची एकूलती एक लेक असल्यामुळे सुहाना रॉयल आयुष्य जगते. तिच्या महागड्या वस्तूंची कायम सोशल मीडियावर चर्चा होत असते.
सुहाना हिच्याबद्दल एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल आणि ती म्हणजे, वयाच्या २१ व्या वर्षी अभिनेत्री कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. न्यूयॉर्क याठिकाणी सुहाना हिचं भव्य घर आहे. या घरात राहून किंग खान याच्या लेकीने शिक्षण पूर्ण केलं. परदेशात असलेल्या सुहाना हिच्या भव्य घराची किंमत जवळपास ३५ कोटी रुपये आहे.
शिवाय सुहाना हिला महागड्या गाड्यांचा देखील शोक आहे. सुहाना हिच्याकडे रेंज रोव्हर आणि लेंबोर्गिनी यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. सुहाना खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, सुहाना लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सुहाना झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिज’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमात सुहाना शिवाय अन्य स्टारकिड्स देखील झळकणार आहेत.
‘द अर्चिज’ सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर देखील झळरणार आहेत. सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शि होणार आहे. सध्या सर्वत्र स्टारकिड्सच्या सिनेमाची चर्चा रंगत आहे.
सुहाना खान सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सुहानाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवंढच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुहाना कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अशात सुहानाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे आणि शाहरुख खान याचे चाहते उत्सुक आहेत.