सोनाक्षी सिन्हाचं मुस्लीम मुलासोबत लग्न, शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘कुटुंबावर होणारे हल्ले …’

Shatrughan Sinha on Zaheer Iqbal Sonakshi Sinha Interfaith Marriage : 'माझ्या कुटुंबावर होणारे हल्ले ...', सोनाक्षी सिन्हा - झहीर इक्बाल यांच्या नात्याला होता कुटुंबियांचा विरोध, अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं सत्य...

सोनाक्षी सिन्हाचं मुस्लीम मुलासोबत लग्न, शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'कुटुंबावर होणारे हल्ले ...'
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 10:58 AM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाला 2 आठवडे होणार आहेत. सोनाक्षी सिन्हा हिंदू आणि झहीर मुस्लिम असल्यामुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर अनेक वाद रंगले होते. शिवाय सोनाक्षीच्या लग्नामुळे कुटुबियांमध्ये देखील नाराजी असल्याची माहिती समोर आली होती. याच कारणामुळे बहिणीच्या लग्नात भाऊ लव सिन्हा उपस्थित नव्हता… अशा चर्चांनी देखील जोर धरला. आता यावर खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सिन्हा कुटुंबिय तुफान चर्चेत आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, ‘अत्यंत क्रूर बदनामी मोहिमेला सामोरं जावं लागलं आहे. याआधी देखील अनेक मोठ-मोठी संकटं आली आहेत. दोन समाजातील फरकाबाबत सिन्हा म्हणाले, ‘चिंता करण्यासारखं काही नव्हतं. आम्ही पण एका सामान्य कुटुंबासारखे होतो, जिथे लग्न होत होते.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

मुलगा लव, सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाच्या विरोधात आहे आणि लग्न स्वीकारत नाही याबद्दल बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘कुटुंबातील विषय आहे. त्यामुळे तो कुटुंबात राहणं उत्तम आहे. मी म्हटल्याप्रमाणे कोणत्या कुटुंबात मतभेद नाहीत? काही मुद्द्यांवर फक्त आपले विचार सारखे असू शकत नाहीत. वाद होतात. पण अखेर आम्ही एक कुटुंब आहोत आणि कोणी आम्हाला तोडू शकत नाही..’

‘आमच्याकडे लोकांचं का एवढं लक्ष वेधलं जात आहे. याचं कारण माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला माहिती असेल. आमच्या कुटुंबाला अपप्रचाराचा बळी बनवण्यात आलं. माझ्या कुटुंबावर होणारे हल्ले मी खपवून घेणार नाही, हे मी याठिकीणी स्पष्ट करतो.’ असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

सोनाक्षी हिच्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘एक वडील म्हणून मी माझ्या मुलीसाठी आनंदी आहे. ती जे निर्णय घेतले आहे, त्यासाठी मी कायम तिच्यासोबत असेल. तिचा आनंद आमचा आनंद आहे. सोनाक्षीला पाहिल्यानंतर मला आनंद मिळतो. मला माझ्या मुलीला कायम आनंदी पाहायचं आहे…’

सोनाक्षी – झहीर यांचं लग्न

सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, वांद्रे येथील घरात सोनाक्षी – झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.