‘कतरिनासोबत लग्न झालं नसतं तर…’, ‘या’ पुरुषासोबत करायचं होतं विकी कौशल याला लग्न?

Vicky Kaushal : कतरिना कैफ नाही तर, 'या' पुरुषासोबत करायचं होतं विकी कौशल याला लग्न? अनेक दिवसांनंतर सत्य समोर... लग्नाच्या दोन वर्षांनंतर पत्नीबद्दल असं का म्हणाला विकी कौशल? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी कौशल याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

'कतरिनासोबत लग्न झालं नसतं तर...', 'या' पुरुषासोबत करायचं होतं विकी कौशल याला लग्न?
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 8:23 AM

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी 21 डिसेंबर 2021 मध्ये शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. चाहत्यांना देखील विकी – कतरिना यांची जोडी फार आवडते. पण आता विकी कौशल याच्याबद्दल एक मोठी गोष्ट समोर येत आहे. विकी कौशल याल अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत लग्न झालं नसतं, तर अभिनेत्याने बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत लग्न केलं असतं. ज्या सेलिब्रिटीसोबत विकी याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, तो सेलिब्रिटी दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता शाहरुख खान आहे. किंग खान याने नुकताच याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

शाहरुख खान म्हणाला, ‘दोन – तीन वेळा विकी कौशल मला फोन करुन म्हणाला, कतरिना हिच्यासोबत मी लग्न केलं आहे. जर माझं लग्न झालं नसतं तर, मी तुमच्यासोबत (शाहरुख खान) लग्न केलं असतं.’ याच दरम्यान राजकुमार हिरानी म्हणाले, सिनेमातील एका सीननंतर लिंबूचा तुकडा शाहरुख खान याने चाटला आणि विकी याला दिला. विकीने देखील तो लिंबूचा तुकडा चाटला..

सांगायचं झालं तर, विकी कौशल आणि शाहरुख खान लवकरत ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सध्या सिनेमातील सेलिब्रिटी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशन दरम्यान शाहरुख याने विकी कौशल याच्या कामाचं देखील कौतुक केलं.

हे सुद्धा वाचा

किंग खान म्हणाला, ‘विकी एक उत्तम कलाकार आहे. मी आतापर्यंत अनेक चांगल्या कलाकारांसोबत काम केलं आहे. त्यापैकी विकी देखील एक आहे. ‘डंकी’ सिनेमात तुम्ही विकी याला पाहाल तर, तुम्ही देखील त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त कराल. त्याकडून मला अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या आहेत…’ असं देखील शाहरुख म्हणाला.

सध्या सर्वत्र शहारुख खान – विकी कौशल यांची मैत्री आणि ‘डंकी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. ‘डंकी’ सिनेमा 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘डंकी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमात शहारुख खान – विकी यांच्यासोबत अभिनेत्री तापसी पन्नू देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहरुख खान याने यंदाच्या वर्षी दोन हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई देखील केली. फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील ‘पठाण’ आणि ‘जवान’ नवीन विक्रम रचले. आता ‘डंकी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.