ऋतिक रोशन आणि सुझान खान एकत्र, लोकांनी थेट विचारले, सबा आझाद नेमकी…
अभिनेता ऋतिक रोशन हा कायमच चर्चेत असतो. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला गेल्या काही वर्षांपासून डेट करतोय. ऋतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट झालाय. यानंतर ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. सोशल मीडियावरही ऋतिक रोशन सबासोबतचे फोटो शेअर करताना दिसतो.
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा कायमच चर्चेत असतो. ऋतिक रोशनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऋतिक रोशन हा त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. ऋतिक आणि सबा यांच्या वयामध्ये मोठे अंतर आहे. ऋतिक रोशन हा लवकरच सबा आझाद हिच्यासोबत लग्न करणार असल्याचेही सातत्याने सांगितले जाते. मात्र, यावर ऋतिक रोशन याने कायमच भाष्य करणे टाळले. ऋतिक रोशन सोशल मीडियावरही सक्रिय दिसतो.
काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे विदेशात धमाल करताना दिसले. यांचे विदेशातील अनेक फोटो व्हायरल होताना दिसले. सध्या ऋतिक रोशन हा एक्स पत्नी सुझान खान हिच्यासोबत स्पॉट झालाय. विशेष म्हणजे यांचे डिनर डेटचे फोटो आणि काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावेळी दोघांनी एकसोबत फोटोसाठी पोझ देखील दिल्या.
ऋतिक रोशन याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर सुझान खान ही अभिनेता अरसलान गोनी याला डेट करत आहे. अरसलान गोनी हा टिव्ही अभिनेता अली गोनी याचा मोठा भाऊ आहे. अरसलान गोनी आणि सुझान खान हे रिलेशनमध्ये आहेत. ऋतिक रोशन हा सुझान खान हिच्या फॅमिलीसोबत जेवणासाठी पोहचला होता. यावेळी अरसलान गोनी हा देखील उपस्थित होता.
ऋतिक रोशन हा जबरदस्त अशा लूकमध्ये दिसला. व्हिडीओमध्ये आणि फोटोमध्ये कुठेच सबा आझाद ही दिसत नाहीये. सबा आझाद दिसत नसल्याने अनेकांनी कमेंट करत म्हटले की, सबा आझाद कुठे आहे? डिनरसाठी सबा आझाद न पोहोचल्याने आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. सबा आझाद हिने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.
पोस्टमध्ये सबा आझाद हिने म्हटले होते की, मोठ्या अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये असल्याने लोक मला काम देत नाहीत. मुळात म्हणजे मी जर एखाद्या मोठ्या अभिनेत्याला डेट करत असेल तर याचा अर्थ असा नाही होत की, तो व्यक्ती माझ्या घराचे लाईट बिल आणि माझा खर्च उचलणार ना? ऋतिक रोशन याच्यासोबत डेट करत असल्याने आपले काय नुकसान होत आहे हेच सांगताना सबा आझाद दिसली.