Alia Bhatt | आलिया भट्ट हिचा मोठा खुलासा, थेट ‘या’ व्यक्तीने म्हटले, तू कधीच चांगली आई नाही होऊ शकत
आलिया भट्ट ही सध्या चर्चेत आहे. रणवीर सिंह आणि आलिया यांचा चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे दिसत आहेत.
मुंबई : रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामुळे सध्या आलिया भट्ट (Alia Bhatt) ही चर्चेत आहे. विशेष म्हणजे आलिया भट्ट हिच्यासोबत या चित्रपटात रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलीला करीना कपूर (Kareena Kapoor) हिच्या घरी घेऊन आलिया भट्ट ही गेली होती. 6 नोव्हेंबरला आलिया भट्ट हिने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. मात्र, आलिया भट्ट हिने आपल्या मुलीचे एकही झलक ही चाहत्यांना अजून दाखवली नाहीये.
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील आलिया भट्ट ही दिसत आहे. आलिया भट्ट हिने राहा हिला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटातील गाणे शूट केले. नुकताच आलिया भट्ट हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना आलिया भट्ट ही दिसली आहे.
आपल्याला माहितीच आहे की, बऱ्याच अभिनेत्री या लग्न आणि त्यामध्येही मुले झाली की, अभिनयापासून दूर जातात. त्यानंतर शक्यतो त्या कुठल्याही चित्रपटामध्ये काम करताना दिसत नाहीत. मात्र, याला आलिया भट्ट ही अपवाद ठरलीये. राहा हिच्या जन्मानंतरही आलिया ही अभिनयाकडे परत वळलीये. यावरच बोलताना आलिय भट्ट ही दिसली आहे.
आलिया भट्ट म्हणाली की, मला वाटते की, मी प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ दोन्हीकडे उपस्थित राहिला पाहिजे. मी तेच करणाऱ्या प्रयत्न करत आहे आणि माझे बेस्ट देण्यासाठीही प्रयत्न करत आहे.परंतू या सर्वांमध्ये कुठेतरी मी स्वत:ला अजिबातच वेळ देऊ शकत नाहीये. मला अजिबातच काही विचार करण्यासाठीही वेळ मिळत नाहीये.
पुढे आलिया भट्ट म्हणाली, मला कोणीतरी म्हटले होते की, तू चांगली आई आणि अभिनेत्री होऊ शकत नाहीस. मी नेहमीच माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत बिनधास्त बोलण्याचा प्रयत्न करते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्न केले.
14 एप्रिल 2022 रोजी मुंबईत अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीर हे लग्न बंधनात अडकले. काही दिवसांपूर्वीच कश्मीर येथे रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी आलिया भट्ट ही राहा हिला घेऊन गेली होती. याबद्दलची माहिती रणबीर कपूर याने दिली होती.