Ananya Pandey | कसा असले अनन्या पांडे हिचा होणारा पती? अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

Ananya Pandey | आदित्य रॉय कपूर याच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना, अनन्या हिने होणाऱ्या पतीबद्दल सोडलं मौन... सध्या सर्वत्र अनन्या पांडे हिच्या वक्तव्याची चर्चा...

Ananya Pandey | कसा असले अनन्या पांडे हिचा होणारा पती? अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 10:30 AM

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरण.. सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या नात्याबद्दल. गेल्या काही दिवसांपासून आदित्य आणि अनन्या यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. पण आतापर्यंत दोघांपैकी कोणीही नात्याबद्दल अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण नुकताच झालेल्या मुलाखतीत अनन्या हिने कसा पती हवाय? याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र अनन्या पांडे हिच्या वक्तव्याची चर्चा आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अनन्या पांडे हिला, ‘कसा पती हवा?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अनन्या म्हणाली, ‘मला असं वाटतं माझे वडील एक उत्तम पती आहेत. माझा होणारा पती माझ्या वडिलांप्रमाणे दयाळू, प्रेमळ आणि उत्साही असयला हवा.. माझ्या अशा अपेक्षा आहेत. माझे वडील उत्तम व्यक्ती आहेत. म्हणून माझा पती देखील माझ्या वडिलांप्रमाणे असावा अशी माझी इच्छा आहे…’ असं देखील अनन्या म्हणाली..

अनन्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अनन्या हिचं नाव अभिनेता ईशान खट्टर याच्यासोबत जोडण्यात आलं होतं.अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. आता अनन्या आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

आदित्य आणि अनन्या यांनी स्पेनमध्ये देखील एकमेकांसोबत वेळ घालवला. दोघांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे अनन्या आणि आदित्य कधी त्यांच्या नात्याची कबुली देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अभिनेत्री क्रिती सनॉन हिच्या दिवाळी पार्टीमध्ये देखील अनन्या आणि आदित्य यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. शिवाय अनेक ठिकाणी अनन्या आणि आदित्या यांना स्पॉट करण्यात आलं आहे. पण दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे अनन्या – आदित्य खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही.. कळू शकलेलं नाही.

आदित्य आणि अनन्या यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच अनुराग बासू यांच्या ”मेट्रो इन दिनों’ सिनेमात दिसणार आहे. तर अनन्या आयुष्मान खुराना याच्यासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमात दिसणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.