दीपिका पादुकोण हिने केला अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाली, एक अशी व्यक्ती…
दीपिका पादुकोण हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका पादुकोण हिचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसला आहे.
मुंबई : दीपिका पादुकोण ही आज बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पादुकोण हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तिने काही मोठे खुलासे केले. दीपिका पादुकोण थेट म्हणाली की, मला जेंव्हा एखादी गोष्टी खूप करण्याची इच्छा होते, त्यावेळी ती करताना मी कधीच दोनदा विचार करत नाही. इतकेच नाही तर आता मी एक अशी व्यक्ती बनले आहे जिथे मला माझ्या चुका स्वीकार करण्यास आणि मी केलेल्या चुका मान्य करण्यास काहीही भीती किंवा कमीपणा वाटत नाही, किंवा ते मान्य करण्यासही मी घाबरत नाही.
पुढे दीपिका पादुकोण म्हणाली की, मी कधीच सॉरी म्हणायला देखील घाबरत नाही. तसेच यावेळी दीपिका पादुकोण हिने हा देखील खुलासा केला की, ट्रोलिंगचाही तिच्यावर काही परिणाम हा होत नाही. दीपिका पादुकोण ही काही दिवसांपूर्वीच करण जोहर याच्या शोमध्ये पोहचली होती. विशेष म्हणजे यावेळी दीपिका पादुकोण हिच्यासोबत रणवीर सिंह हा देखील होता.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह त्यांच्या रिलेशनवर बोलताना दिसले. रणवीर सिंह याने सांगितले की, पहिल्यांदा त्याने दीपिका पादुकोण हिला प्रपोज नेमका कधी केला. इतकेच नाही तर दीपिका पादुकोण हिने मोठा खुलासा करत थेट म्हटले की, मी रणवीर सिंह याला टाईमपास म्हणून होकार दिला होता, मी अजिबात त्याच्याबद्दल सीरियस कधीच नव्हते.
दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण हिचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. दीपिका पादुकोण हिच्यासोबत शाहरूख खान या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.
फक्त इतकेच नाही तर शाहरूख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा हाच चित्रपट ठरलाय. दीपिका पादुकोण पठाण चित्रपटामध्ये धमाका करताना दिसली. दीपिका पादुकोण हिने काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये अत्यंत महागड्या परिसरात अत्यंत आलिशान असे घर खरेदी केले. दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय कायमच दिसते.