दीपिका पादुकोण आजारी, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण, ती पोस्ट व्हायरल होताच…
बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही कायमच चर्चेत असते. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका पादुकोण हिचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने जोरदार धमाका केला.
मुंबई : दीपिका पादुकोण ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका पादुकोण सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय देखील दिसते. नुकताच आता दीपिका पादुकोण हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. दीपिका पादुकोण हिची ही पोस्ट पाहून चाहते हे चितेंमध्ये आलेत. दीपिका पादुकोण हिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा फायटर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
विशेष बाब म्हणजे ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा फायटर हा चित्रपट यंदाचा बिग बजेट चित्रपट असणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण हे दिसणार आहेत. नुकताच आता फायटर चित्रपटाचा ट्रेलर लाॅन्चचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दीपिका पादुकोण ही उपस्थित नव्हती.
आता दीपिका पादुकोण हिची पोस्ट चर्चेत आलीये. दीपिका पादुकोण हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फायटर चित्रपटाच्या टिमला शुभेच्छा देताना लिहिले की, स्क्वाड्रनला मिस करतंय..टीमला शुभेच्छा! सोबत एक पंच इमोजी ही तिने शेअर केलाय. दीपिकाने पोस्टमध्ये काही इमोजी शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने आजारी पडल्याचे सांगितले आहे.
आता दीपिका पादुकोण हिची हीच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. हा चित्रपट अत्यंत खास आहे. कारण ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण हे पहिल्यांदाच एकसोबत धमाका करताना दिसणार आहेत. 250 कोटी या चित्रपटाचे बजेट असल्याचे सांगितले जातंय. हा मोठा बिग बजेटचा चित्रपट नक्कीच आहे.
फायटर या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. हा चित्रपट नेमका काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कधी रिलीज होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. हा व्हिडीओ कश्मीर येथील होता, जेथे ऋतिक रोशन हा चित्रपटाची शूटिंग करताना दिसला.