घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न, सावत्र मुलगीच नाहीतर, स्वतःचा मुलगाही नाही म्हणत आई, कारण…

Actress Life | घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न... लग्नाआधी राहिली गरोदर, सावत्र मुलगी आणि स्वतःचा मुलगा देखील तिला नाही म्हणत आई, अनेक वर्षांनंतर म्हणाली..., लग्नाआधी गरोदर राहिल्यामुळे अभिनेत्रीला करण्यात आलं होतं ट्रोल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न, सावत्र मुलगीच नाहीतर, स्वतःचा मुलगाही नाही म्हणत आई, कारण...
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 9:37 AM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं. तर अनेक अभिनेत्री लग्नाआधी गरोदर राहिल्या, ज्यामुळे अभिनेत्रींना अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. पण आता ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्रीने घटस्फोटानंतर लग्न दुसरं लग्न केलं आणि लग्नाआधीच गरोदर राहिली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाहीतर, अभिनेत्री दिया मिर्झा आहे. दिया हिने दुसरं लग्न उद्योजक वैभव राखी यांच्यासोबत केलं. लग्नानंतर काही महिन्यात दोघांनी मुलगा अवयान याचं जगात स्वागत केलं.

दिया हिच्या दुसऱ्या पतीबद्दल सांगायचं झालं तर, वैभव राखी यांचं देखील दिया हिच्यासोबत दुसरं लग्न आहे. वैभव यांना देखील एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव समायरा असं आहे. दिया पती वैभव आणि सावत्र मुलगी समायरा हिच्यासोबत एकाच घरात राहते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिया हिने मोठं सत्य सांगितलं आहे. दिया हिला सावत्र मुलगी आणि तिचा स्वतःचा मुलगा देखील आई म्हणून हाक मारत नाही.

अभिनेत्री म्हणाली, ‘मी समायरा हिला कधीच सांगितलं नाही मला आई म्हणून हाक मार आणि मला अशा अपेक्षा देखील नाही की तिने मला आई, मम्मी किंवा मम्मा म्हणून बोलवावं… तिची आई आहे, जिला ती आई म्हणून बोलावते… मी तर समायरा हिचे आभार मानते कारण अवयान देखील माला दिया म्हणून बोलावतो.’

हे सुद्धा वाचा

‘समायरा आणि अवयान दोघे मला दिया म्हणून बोलावतात. कधी-कधी अवयान मला दिया मॉम म्हणून बोलावतो, जे ऐकायला फार विनोदी असतं. अवयान आता बोलायला लागला आहे. पण आई हा शब्द तो फार उशीरा बोलला. पण जेव्हा अवयान याने मला आई म्हणून हाक मारली तेव्हा वैभव याने व्हिडीओ शूट केला. जो मी कायम ऐकत असते. ऐकून मला आनंद मिळतो..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

दिया मिर्झा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दिया तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्तेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत दिया चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.