घटस्फोटानंतर ईशा देओलचं मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप…’

Esha Deol on her life: घटस्फोट आणि आई - वडिलांबद्दल ईशा देओल हिने अखेर मौन सोडलं, अभिनेत्री म्हणाली, 'घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप...', दोन मुलींच्या जन्मानंतर पती भरत तख्तानी याने सोडली अभिनेत्रीची साथ, घटस्फोटानंतर ईशा देओल एकटीच करतेय मुलींचा सांभाळ...

घटस्फोटानंतर ईशा देओलचं मोठं वक्तव्य; म्हणाली, 'घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप...'
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 12:36 PM

अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलचं बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये सामिल आहे. ईशाने 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोई मेरे दिल से पूछे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही हीट सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर ईशाने अभिनय विश्वाचा निरोप घेतला. कायम सिनेमांमुळे चर्चेत राहाणारी ईशा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत सुधारलेल्या नात्यामुळे आणि भरत तख्तानी याच्यासोबत झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे.

दरम्यान, एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र ईशा देओल हिच्या चर्चा असायच्या. त्या काळात स्वतःच्या सौंदर्याने आणि ट्रेंडसेटिंग फॅशन पिक्सने खळबळ माजवणाऱ्या ईशाला नुकताच तिच्या करिअरमधील जुने दिवस आठवले. भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने पहिल्यांदा मौन सोडलं आणि म्हणाली- आता कोणताही पश्चाताप नाही. असं ईशा का म्हणाली? याबद्दल जाणून घेऊ.

जुन्या दिवसांच्या आठवणी सांगत ईशा म्हणाली, ‘ती माझी विस्मयकारक वर्षे उत्साहाने, निरागसतेने भरलेली होती. हे फक्त 20 वर्षांची मुलगी अनुभवू शकते. मला आता कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही, मी त्यावेळी जे काही केले त्यात मी समाधानी आहे.’

ईशा हिने 2012 मध्ये लहानपणीची मित्र भपत तख्तानी याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने दोन मुलींना जन्म देखील दिला. पण 2024 मध्ये भरत आणि ईशा याचा घटस्फोट झाला.जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आलं, लग्न आणि मातृत्वाचा प्रवास तिच्या आयुष्यात खूप लवकरच आला असं तिला वाटतं का?

या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘नाही… मी माझ्या कामाबद्दल नेहमीच उत्कट राहिली आहे. मी जे काही काम केलं त्यात मी माझं शंभर टक्के दिलं आणि मग प्रेमात पडलो. मी तेव्हा असं का केलं, याचा आज मला कोणताही पश्चाताप नाही. शिवाय सतत आई-वडिलांसोबत होत असलेल्या तुलनेबद्दल देखील अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.

यावर ईशा म्हणाली, ‘प्रत्येक गोष्ट या क्षेत्राचा भाग आहे. अनेक लोकांसाठी हा एक टार्गेट पॉइंट आहे. पण यावर मी कधीच लक्ष दिलं नाही. मला जे करायचं होतं, ते मी पूर्ण मनाने केलं आहे. प्रेमाळ आई – वडिलांच्या घरात माझा जन्म झाला, याला मी स्वतःचं सौभग्य समजते… मला आता नवीन कामं मिळत आहेत आणि ती करण्यासाठी मी उत्सुक आहे…’ असं देखील ईशा देओल म्हणाली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.