कोणाची लागली बोली, तर कोणाला हॉटेलमध्ये बेदम मारलं…Karisma Kapoor प्रमाणेच ‘या’ अभिनेत्री लग्नानंतर संकटात

करिश्मा कपूर हिच्याप्रमाणे बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींचा देखील झालाय सासरी छळ; कोणाला बॉयफ्रेंडने बेदम मारलं, तर 'या' अभिनेत्रीला हॉटेलमध्ये...

कोणाची लागली बोली, तर कोणाला हॉटेलमध्ये बेदम मारलं...Karisma Kapoor प्रमाणेच 'या' अभिनेत्री लग्नानंतर संकटात
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 11:48 AM

मुंबई | झगमगत्या विश्वातून अनेक चांगल्या – वाईट गोष्टी समोर येत असतात. पण सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात किती चढ – उतार येत असतात… हे फार क्वचित सर्वांच्या समोर येतं. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचं नात घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. एवढंच नाही, काही सेलिब्रिटींचं नातं लग्नापर्यंत देखील पोहोचू शकलं नाही. कोणी स्वतःच्या पत्नीची बोली लावली, तर कोणी ज्या महिलेवर प्रेम केलं तिलाचं बेदम मारलं. अभिनेत्रींनी त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला पण त्या खचल्या नाहीत, आयुष्याची नव्याने सुरुवात केली. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर… करिश्मा कपूर हिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे.

करिश्मा कपूर हिच्याप्रमाणे बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री आहे, जिने तिच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला. एक काळ बॉलिवूडमध्ये राज्य केलेल्या रती अग्निहोत्री हिने पहिला पती अनिल वीरवानी याच्या घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली की, ‘३० वर्ष फक्त मुलामुळे शांत होती. फक्त त्रास सहण करत होती..’ अखेर सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून रती हिने २०१५ मध्ये घटस्फोट घेतला…

अभिनेत्री जिया खान हिच्याबद्दल देखील आज सर्वांना माहिती आहे. यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्री २०१३ मध्ये स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. निधनापूर्वी अभिनेत्रीने एक पत्र लिहिलं होतं. पत्रामध्ये जियाने बॉयफ्रेंड सुरज पंचोली याला जबाबदार ठरवलं होतं. यानंतर, अभिनेत्रीच्या आईने सूरजविरोधात खटला दाखल केला, अखेर विशेष सीबीआय न्यायालयाने १० वर्षांनंतर अभिनेत्याची निर्दोष मुक्तता केली.

करिश्मा कपूर, जिया खान फक्त या अभिनेत्री नाही तर, दिग्दर्शक महेश भट्ट यांनी मुलगी पूजा भट्ट हिने देखील बॉयफ्रेंडला कंटाळून ब्रेकअपचा निर्णय घेतला. पूजाने बॉयफ्रेंडवर मारहाण करण्याचे आरोप लावले होते. पूजाच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव रणवीर शौरे आहे…

अभिनेत्री झीनत अमान यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील सर्वत्र खळबळ माजली होती. झीनत अमान यांनी संजय खान यांच्यासोबत लग्न केलं होतं. पण झीनत अमान यांच्यासोबत जेव्हा संजय यांनी लग्न केलं तेव्हा ते विवाहित होते. रिपोर्टनुसार संजय यांनी झीनत अमान यांना एका हॉटेलमध्ये मारलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी संजय यांची पहिली पत्नी देखील हॉटेलमध्ये होती. अखेत सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून झीनत अमान यांनी लग्नाच्या एका वर्षानंतर पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला..

करिश्मा आणि संजय यांचं लग्न २००३ मध्ये झालं पण हे नातं फार काळ टिकलं नाही. एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर २०१४ मध्ये दोघे विभक्त झाले. लग्नानंतर पहिल्याच रात्री संजय याने अभिनेत्रीची बोली लावली असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या… आज घटस्फोटानंतर करिश्मा कपूर तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.