‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाला डेट करतेय Ileana D’cruz? प्रेग्नेंसीची घोषणा करताच चर्चांना उधाण

Ileana D’cruz लवकरच होणार आई, नेटकरी विचारतायत ‘बाळाचा होणारा पिता कोण?’, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाला डेट करत असल्याची चर्चा...

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाला डेट करतेय Ileana D’cruz? प्रेग्नेंसीची घोषणा करताच चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 11:49 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D’cruz) हिने गरोदर असल्याची घोषणा केली आहे. लग्नाआधी अभिनेत्री गरोदर असल्यामुळे चर्चांचा उधाण आलं आहे. इलियाना डिक्रूझ हिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली. लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. लहान बाळाच्या ड्रेसवर ‘.. आणि प्रवासाला सुरुवात’ असं लिहिलं आहे. तर अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘लवकरच.. तुला भेटण्यासाठी आता प्रतीक्षा करु शकत नाही…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने फोटो पोस्ट केल्यानंतर सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.

अभिनेत्रीने प्रेग्नेंसीची घोषणा करताच चर्चांना उधाण आलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. ‘लग्न कधी झालं’,’बाळाचा होणारा पिता कोण?’ असे अनेक प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात येत आहेत. इलियाना डिक्रूझ हिच्या होणाऱ्या बाळाची चर्चा रंगत असताना अभिनेत्रीच्या अफेअरबद्दल देखील अनेक चर्चा रंगत आहेत.

हे सुद्धा वाचा

इलियाना हिच्या अफेअर्सबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बरीच वर्षे अँड्र्यू नीबोन या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरला डेट करत होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. त्यानंतर इलियाना हिचं नाव बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या भावासोबत जोडण्यात आलं. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

गेल्या वर्षी कतरिना हिता वाढदिवस साजरा करण्यासाठी विकी कौशल, सनी कौशल, शर्वरी वाघ मालदीव याठिकाणी होते. त्यांच्यासोबत इलियाना आणि कतरिनाचा भाऊ सेबेस्टियन देखील होता. खुद्द इलियाना हिने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये इलियाना आणि सेबेस्टियन एकाच फ्रेममध्ये दिसले. तेव्हा इलियाना आणि सेबेस्टियन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला, पण दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

महत्त्वाचं म्हणजे इलियाना सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे कायम चर्तेत असते. कतरिना आणि विकी यांच्या लग्नात देखील इलियाना आणि सेबेस्टियन यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. गेल्या काही महिन्यांपासून इलियाना आणि सेबेस्टियन एकमेकांमा डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण दोघांनी देखील नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

सोशल मीडियावर इलियाना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोळल मीडियावर शेअर करत असते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.