विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात जुही चावला? अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं सत्य

Juhi Chawla : जुही चावला हिने वयाच्या 56 व्या वर्षी हिने मनातल्या भावना केल्या व्यक्त, पतीबद्दल असं का म्हणाली अभिनेत्री? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जुही चावला हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात जुही चावला? अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं सत्य
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 12:10 PM

मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री जूही चावला आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील जुही चावला तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. विवाहित अभिनेत्यावर असलंले प्रेम आणि पती जय मेहता यांच्याबद्दल जुही हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जुही चावला आणि अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

‘झलक दिखला जा 11’ शोच्या सेटवर पाहुणी म्हणून आलेल्या जुही हिने मोठं वक्तव्य केलं आहे. शोमधील ‘फालूदा विथ फराह’ या सेगमेंटमध्ये फराह खान हिने विचारलेल्या सर्व प्रश्नानांची उत्तर देत अनेक गोष्टींचा खुलासा केला.

फराह हिने जुही हिला विचारलं, ‘कधी कोणत्या विवाहित अभिनेत्याचा तुझ्यावर जीव जडला आहे का?’ यावर जुही म्हणाली, ‘एखादा विवाहित अभिनेता पडला असेल माझ्या प्रेमात, पण कधी त्याने मला त्याच्या भावनांबद्दल सांगितलं नाही…’

हे सुद्धा वाचा

पुढे फराहने, ‘तू कधी होतीस एखाद्या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात?’ यावर जुही हिने उत्तर देण्याआधीच अभिनेता अर्शद वारसी म्हणाला, ‘हिने कधी त्या अभिनेत्याला स्वतःच्या मनातील भावना सांगितल्या नसतील…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जुही चावला हिची चर्चा रंगली आहे.

उद्योजक जय मेहता यांच्याबद्दल देखील फराह हिने जुहीला प्रश्न विचारला. ‘तू गेल्या अनेक वर्षांपासून एक हेअर ऑईलची जाहिरात करत आहेस, ज्यामुळे केस येतात. असं असताना तू कधी तेल तुझ्या पतीला दिला नाही…’ यावर जुही हिने विनोदी अंदाजात उत्तर दिलं आहे.

जुही म्हणाली, ‘लग्न झाल्यानंतर पती – पत्नी कधीच एकमेकांचं ऐकत नाहीत. माझ्या पतीने देखील मी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या नाहीत. म्हणून अशी परिस्थिती झाली आहे..’ जुहीच्या उत्तरावर फराह सोबत उपस्थित अन्य व्यक्ती देखील पोट धरुन हसू लागतात.

जुही आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील जूही कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.