Kareena Kapoor पुन्हा होणार आई! बेबी बम्प दिसल्यामुळे चर्चांना उधाण

Kareena Kapoor | सैफ अली खान पाचव्यांदा होणार बाबा, करीना कपूर पुन्हा प्रेग्नेंट! व्हायरल फोटोमध्ये बेबी बम्प दिसल्यामुळे चर्चांना उधाण... नक्की काय आहे सत्य?

Kareena Kapoor पुन्हा होणार आई! बेबी बम्प दिसल्यामुळे चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 10:11 AM

मुंबई : 8 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर करीना कपूर हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सुरुवातील अभिनेत्री स्वतःचं पोट लपवताना दिसली. अभिनेत्री पोट लवपताना दिसत असल्यामुळे करीना पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना कपूर हिची चर्चा रंगली आहे. करीना आणि अभिनेता सैफ अली खान यांना दोन मुलं आहे. त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तौमूर अली खान असून दुसऱ्या मुलाचं नाव जेह अली खान असं आहे. आता करीना तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

दरम्यान, 31 ऑगस्ट, 2023 मध्ये करीना कपूर, अभिनेत्री किआरा अडवाणी आणि सुहाना खान, अभिनेता अर्जुन कपूर यांच्यासोबत ईशा अंबानी यांच्या सौंदर्य उत्पादन ब्रॅन्ड टीराच्या लॉन्च कार्यक्रमासाठी पोहोचली होती. कार्यक्रमाआधी करीना कपूर तिच्या टीमसोबत पोहोचली. करीनाचा एक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये करीना एका ठिकाणी बसली आहे. पण अनेकांचं लक्ष अभिनेत्रीच्या बेबी बम्पवर येवून थांबलं. करीनाचा फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोग धरला आहे. पण यावर करीना हिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देत आहे. याआधी देखील अनेकदा करीना तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

आता व्हायरल होत असलेला करीना हिचा फोटो पाहिल्यानंतर नेटकरी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘करीना पुन्हा प्रेग्नेंट आहे का?’ सध्या सर्वत्र करीना हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

करीना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं. करीना हिच्यासोबत सैफ याचं दुसरं लग्न आहे. सैफ अली खान याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं अधिक काळ टिकलं नाही.

सैफ अली खान आणि अमृता यांना देखील दोन मुलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव सारा अली खान असून मुलाचं नाव इब्राहीम अली खान असं आहे. सैफ अली खान चार मुलांचा बाबा आहे. पण आता पुन्हा करीनाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरल्यामुळे अभिनेता पाचव्यांदा बाबा होईल अशी चर्चा देखील सर्वत्र रंगत आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.