Karisma Kapoor हिचा एक मोठा निर्णय, ज्यामुळे अभिनेत्रीचे दिवस पूर्णपणे बदलले..

निर्णय घ्यायची वेळ प्रत्येकावर येते.. करिश्मा कपूर हिच्या आयुष्यात देखील अशी वेळी आली.. 'त्या' एका महत्त्वाच्या निर्णयानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात झाले मोठे बदल...

Karisma Kapoor हिचा एक मोठा निर्णय, ज्यामुळे अभिनेत्रीचे दिवस पूर्णपणे बदलले..
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 10:51 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (karisma Kapoor) आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी अभिनेत्री चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.. करिश्माने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कैदी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.. कपूर कुटुंबाची लेक मोठ्या पडद्यावर आल्यानंतर चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिलं.. ९० च्या दशकात अभिनेता गोविंदा याच्यासोबत करिश्माची जोडी हीट ठरली. राजा बाबू, साजन चले ससुराल… यांसारख्या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली… दोघांच्या जोडीची कमाल बॉक्स ऑफिसवर देखील दिसून आली.. चाहते कायम दोघांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असयाचे.. चाहत्यांनी करिश्मा आणि गोविंदा यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं…

गोविंदासोबत करिश्माचं करियर यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलं होतं… चाहत्यांकडून अभिनेत्रीला प्रेम देखील मिळत होतं.. पण बॉलिवूडमध्ये असलेलं अभिनेत्रीचं स्थान करिश्माला आनंद आणि समाधान देणारं नव्हतं. मीडिया रिपोर्टनुसार, करिश्माला ज्या ओळखीची गरज होती, ती ओळख आणि प्रसिद्धी अभिनेत्रीला गोविंदा याच्यासोबत मिळत नव्हती.. तेव्हा अभिनेत्री जुही चावला, रवीना टंडन यांचा काळ होता..

बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रीचं स्थान मिळवण्यासाठी अभिनेत्रीने मोठा निर्णय घेतला आणि अभिनेत्रीचा निर्णय तिच्या करियरसाठी लाभदायक देखील ठरला.. गोविंदा याच्यासोबत सिनेमांमध्ये काम न करण्याचा निर्णय अभिनेत्रीने घेतला. दरम्यान, अभिनेत्रीच्या निर्णयानंतर करिश्मा आणि गोविंदा यांच्यामध्ये दुरावा आला.. करिश्माला वाटलं की जर तिला अव्वल अभिनेत्रींच्या यादीत सामील व्हायचं असेल तर तिला बॉलिवूडच्या तिन्ही खानासोबत काम करावे लागेल आणि अभिनेत्रीने तसं केलं देखील..

हे सुद्धा वाचा

गोविंदा याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर करिश्माने सलमान, शाहरुख आणि आमिर खान यांच्यासोबत हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. करिश्मा आमिर याच्यासोबत ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमात झळकली. त्यानंतर शाहरुख खान याच्यासोबत ‘दिल तो पागल है’ सिनेमात दिसली.. अखेर ‘हम साथ साथ हैं’ सिनेमात सलमान खान याच्यासोबत काम केल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियते मोठी वाढ झाली…

आता करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.. सध्या करिश्मा तिच्या आगामी ‘ब्राऊन’, ‘मर्डर मुबारक’ वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिची चर्चा रंगत आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.