इतका मोठा झाला करिश्मा कपूर हिचा लेक, संजय कपूर याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर…
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. करिश्मा कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. करिश्मा कपूर सोशल मीडियावर सक्रिय दिसते.
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. करिश्मा कपूरची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. करिश्मा कपूर ही काही वर्षांपासून तशी मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, एक मोठा काळ करिश्मा कपूर हिने चित्रपटांमध्ये गाजवला आहे. करिश्मा कपूर हिने अगदी कमी वयापासून आपल्या करिअरची सुरूवात केली. करिश्मा कपूर हिचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिलेले आहे. करिश्मा कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन यांचे लग्न ठरले होते. मात्र, अचानक काही कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. अभिशेक बच्चन आणि करिश्मा कपूर हे एकमेकांना डेट देखील करत होते.
अभिषेक बच्चन याच्यासोबत नाते तुटल्यानंतर करिश्मा कपूर हिचे लग्न व्यावसायिक संजय कपूर याच्यासोबत झाले. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांना एक मुलगा आणि मुलगी देखील झाले. मात्र, करिश्मा कपूर हिने पती संजय कपूर आणि त्याच्या कुटुंबियांवर अत्यंत गंभीर आरोप केले. ज्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला.
करिश्मा कपूर हिच्या मुलाचे नाव कियान आणि मुलीचे नाव समायरा आहे. विशेष म्हणजे संजय कपूर याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर करिश्मा कपूर हिच आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करते. आता करिश्मा कपूर हिचा मुलगा कियान हा चांगलाच मोठा झालाय. करिश्मा कपूर ही आपल्या दोन्ही मुलांना कॅमेऱ्यापासून दूरच ठेवते.
आता नुकताच करिश्मा कपूर आणि तिचा मुलगा आणि मुलगी एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी करिश्मा कपूरचा मुलगा कियान हा मोठा झाल्याचे दिसतंय. कियान एकदम स्मार्टही दिसतोय. आता करिश्मा कपूर हिच्या मुलाच्या लूकची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. आपल्या दोन्ही लेकरांना घेऊन करिश्मा कपूर ही विदेशात निघालीये.
संजय कपूर याने करिश्मा कपूर हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर लग्न केले. मात्र, घटस्फोटानंतर करिश्मा कपूर हिने लग्न केले नाहीये. करिश्मा कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच करिश्मा कपूर ही बहिण करिना कपूर खान हिच्यासोबत विदेशात खास वेळ घालवताना देखील दिसली होती. करिश्मा कपूर ही एअरपोर्टवर जबरदस्त अशा लूकमध्ये दिसली होती.