Malaika Arora हिला अवडतं घरी बनवलेलं जेवण; आवडतीचा पदार्थ पोस्ट करत म्हणाली…

Malaika Arora | घरी बनवलेले पदार्थ खात मलायका राहते फिट, अभिनेत्रीला 'हा' पदार्थ प्रचंड आवडतो... तुम्हाला देखील कदाचित माहिती असेल पदार्थाबद्दल... सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने सांगितलं पदार्थाबद्दल... सध्या सर्वत्र मलायका हिच्या पोस्टची चर्चा

Malaika Arora हिला अवडतं घरी बनवलेलं जेवण; आवडतीचा पदार्थ पोस्ट करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 8:43 AM

मुंबई : 23 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री मलायका अरोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता मलायका तिच्या घटस्फोटामुळे किंवा रिलेशनशिपमुळे चर्चेत आलेली नाही. आता मलायका चक्क तिला आवडणाऱ्या पदार्थांमुळे चर्चेत आली आहे. सेलिब्रिटींबद्दल अनेक गोष्टी चर्चेत असतात. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या फिटनेसमुळे. मलायका देखील तिच्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. त्यामुळे अभिनेत्री काय खाते, कोणते पेय पिते… तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता खुद्द मलायका हिने तिला आवडणाऱ्या पदार्थाबद्दल सांगितलं आहे. मलायकाला घरचं जेवण प्रचंड आवडतं. बाहेरचं खाणं मलायका नेहमी टाळते. आता देखील अभिनेत्रीने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने तिला आवडणाऱ्या पदार्थाबद्दल सांगितलं आहे.

मलायकाची पहिली पसंती नेहमीच घरच्या जेवणाला असते. मलायका हिला घरी बनवलेले पदार्थ आवडतात म्हणून तिच्या मित्राने पिन्नीचं सरप्राईज दिलं. जे अभिनेत्रीला प्रचंड आवडलं आहे. मलाकाय हिने शुक्रवारी इन्स्टाग्राम स्टोरीवर पिन्नीने भरलेला एक बॉक्स पाठवला. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘मी माझ्या खोलीत पोहोचण्यापूर्वीच, प्रेमाने बनवलेल्या पिन्नीचा बॉक्स माझी वाट पाहत होता…’ असं लिहिलं आहे. पिन्नी म्हणजे काय हे अनेक जणांना माहिती देखील नसेल. पिन्नी उत्तर भारतातील मिठाईचा एक प्रकार आहे. पिन्नी प्रामुख्याने थंडीच्या दिवसांमध्ये तयार केली जाते.

मलायका अरोरा दिसते प्रचंड ग्लॅमरस

अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या ४९ व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते. फिटनेससाठी अभिनेत्री कायम योगा, जीम करताना दिसते. चाहत्यांना देखील अभिनेत्री कायम फिटनेस टिप्स देत असते. सोशल मीडियावर वर्कआऊट करताना अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

मलायका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील मलायका हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

मलायका आणि अर्जुन यांचं नातं

मलायका गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही. अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.