‘स्मशानात घेऊन जायचा आणि मांस खायला सांगायचा…’, ६ फूट उंच पुरुष अभिनेत्रीला द्यायचा त्रास
६ फूट उंच पुरुष अभिनेत्रीला द्यायचा त्रास, तीन दिवसांत अभिनेत्रीने घेतला घर सोडण्याचा निर्णय, घर शिफ्ट करत असताना अभिनेत्रीच्या टीमला दिसली धक्कादायक गोष्ट...
मुंबई | 29 जुलै 2023 : अभिनेत्री कायम त्यांच्या आयुष्याबद्दल सांगत असतात. ज्यामुळे चाहत्यांना देखील अभिनेत्रींच्या आयुष्याबद्दल अनेक गुपित गोष्टी कळत असतात. चाहते देखील अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने देखील अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. नर्गिसने सांगितले की, जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिला काही विचित्र समस्यांचा सामना करावा लागला. नर्गिस स्मशानभूमीच्या शेजारी एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. नर्गिसला भयानक स्वप्ने पडायची. नर्गिसच्या म्हणण्यानुसार, एकदा तिला स्वप्न पडले की एक 6 फूट उंच माणूस तिला स्मशानात घेऊन गेला.
अभिनेत्रीच्या स्वप्नात आलेल्या पुरुषाणे आपल्या हाताने आजूबाजूची जमीन खोदली आणि मृत लोकांचे मृतदेह बाहेर काढले. एवढंच नाही तर, त्यांचं देखील मांस खाऊ लागले. तसेच तो नर्गिसला मांस खायला सांगायचा. नर्गिस इतकी घाबरली की तिला तीन दिवसांनी अपार्टमेंट सोडण्याचा निर्णय घेतला. या भयानक स्वप्नाचा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला होता.
नर्गिस म्हणाली, ‘मला भयानक स्वप्न पडायचे. रोज रात्री तीन वाजता मला जाग यायची. मला रोज स्वप्नात एक पिवळा-पांढरा भयानक माणूस दिसायचा. त्याची उंची ६ फूट ५ इंच असेल. तो पुरुष मला स्मशानात घेवून जायचा. तो स्वतः मांस खायचा आणि मला देखील खायला लवायचा..’
त्रासलेल्या नर्गिसने अखेर घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि टीमला दिल्लीत शिफ्ट होण्यास सांगितलं. पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘ माझी टीम घर शिफ्ट करत असताना जवळ असलेल्या कपाटात मृत अवस्थेत सहा पक्षी होते.’ असं देखील अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली आहे.
नर्गिस हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीने इम्तियाज अली याच्या ‘रॉकस्टार’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर याने मुख्य भूमिका साकारली होती. एका सिनेमातून नर्गिस हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती.
रॉकस्टार’ सिनेमानंतर तिने जॉन अब्राहमसोबत मद्रास कॅफे या सिनेमात काम केलं. याशिवाय ती अझहरसारख्या सिनेमातही दिसली होती. सलमान खान आणि शाहिद कपूरच्या सिनेमांमध्ये नर्गिसने आयटम डान्सही केला.
नर्गिस फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत आली. यश चोप्रा यांचा लहान मुलगा आणि अभिनेता उदय चोप्रा याच्यासोबत नर्गिस हिच्या अफेअरची तुफान चर्चा रंगली. नर्गिस सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.