Nora Fatehi : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ‘असं’ काम करत होती नोरा फतेही, जुना व्हिडीओ तुफान व्हायरल

Nora Fatehi : नोरा फतेही हिचा जुना व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल..., प्रसिद्धी मिळण्यापूर्वी काय करायची अभिनेत्री नोरा फतेही? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा... नेटकरी कमेंट करत म्हणाले...

Nora Fatehi : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी 'असं' काम करत होती नोरा फतेही, जुना व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 1:32 PM

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : अभिनेत्री नोरा फतेही हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोरा हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे. नोराने आपल्या डान्स आणि घायाळ अदांनी चाहत्यांना थक्क केलं. पण एक सामान्य मुलगी ते बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास नोरासाठी प्रचंड अवघड होता. यशाच्या शिखरावर चढत असताना नोराला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. दरम्यान नोरा हिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नोरा फतेही हिच्या पहिल्या ऑडिशनचा आहे.

नोरा फतेही हिचं पहिलं ऑडिशन ते ‘बिग बॉस 9’ मध्ये स्पर्धकाच्या भूमिकेत दिलेल्या नोराला कोणीही विसरु शकलेलं नाही. पण ‘दिलबर’ गाण्यावर भन्नाट डान्स केल्यानंतर नोरा हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये तुफान वाढ झाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

हे सुद्धा वाचा

सध्या व्हायरल होत असलेल्या नोराच्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री एक प्लेकार्ड पकडून उभी असल्याचं दिसत आहे. ज्यावर अभिनेत्रीची उंची, नाव, वय आणि इतर गोष्टी लिहिल्या आहेत. पूर्वी नोरा तिच्या नावाचं स्पेलिंग Naura Fathi अशी लिहित होती. पण आता अभिनेत्रीने तिच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही बदल केले आहेत. आता अभिनेत्री Nora Fatehi असं तिच्या नावाचं स्पेलिंग लिहिते.

सांगायचं झालं तर, नोरा हिने 2014 मध्ये ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या सिनेमातून बॉलिवूड प्रवासाला सुरुवात केली. एका वर्षानंतर, नोरा ‘बिग बॉस 9’ मध्ये दिसली आणि तिने लोकांचे लक्ष वेधून घेतलं. ‘टेम्पर’, ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘किक 2’ सारख्या सिनेमात हिट गाण्यांवर आयटम साँग करून अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली.

नोराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने म्यूझिक एल्बमपासून सिनेमांपर्यंत स्वतःची जादू दाखवली आहे. ‘नाच मेरी रानी’, ‘गर्मी’ यांसारख्या गाण्यांमुळे नोरा कायम प्रसिद्धीझोतात राहिली. चाहते कायम नोराच्या डान्सचं कौतुक करताना दिसतात. नोरा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील नोरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नोरा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. चाहते देखील नोरा हिच्या प्रत्येक फोटो आणि पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.