Israel-Hamas War : ‘बॉम्बहल्ले, चहूबाजूने सायरनचे आवाज…’, इस्रायलमध्ये नुशरत भरुचा हिला आलेला थरारक अनुभव

Israel-Hamas War : इस्रायल मधून सुखरुप भारतात आलेल्या नुशरत भरुचा हिने सांगितला थरारक अनुभव... 'आपण खूप नशीबवान आहोत. कारण आपण भारतासारख्या सुरक्षित देशात राहतो...' असं म्हणत अभिनेत्रीने केली शांततेसाठी प्रार्थना...

Israel-Hamas War : 'बॉम्बहल्ले, चहूबाजूने सायरनचे आवाज...', इस्रायलमध्ये नुशरत भरुचा हिला आलेला थरारक अनुभव
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 8:21 AM

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) मध्ये होत असलेल्या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालं. आतापर्यंत अनेक नागरिकांना स्वतःचे प्राण गमावले आहेत. एवढंच नाही तर अनेक जण जखमी आहेत. इस्रायलमधील तणावग्रस्त वातावरणामुळे संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुशरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. नुकतीच ती सुखरुप मायदेशी परतली आहे. मायदेशी परतल्यानंतर पत्रकारांनी अभिनेत्रीला विमानतळावर चारही घेरलं. पण तेव्हा अभिनेत्री प्रचंड अस्वस्थ दिसत होती. त्यामुळे काही बोलली नाही.

नुशरत भरुचा इस्रायल घडलेल्या घटनेचा अनुभव कधी सांगेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम एक व्हिडीओ आणि एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने भारतीय सरकार आणि भारतीय दुतावासाचे आभार मानले आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. मला मेसेज केले त्यांचे मी आभार मानते. मी घरी परतली असून मी सुखरुप आहे. दोन दिवसांपूर्वी तेल अविवमधील हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटामुळे मला जाग आली, चहूबाजूने सायरनचे आवाज ऐकू येत होते, बॉम्बहल्ले सुरू होते. अत्यंत भयानक परिस्थिती होती.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी कधीच अशा परिस्थितीचा सामना केलेला नाही. आज मी माझ्या घरात आहे. झोपून उठली आणि मला जाणवलं आपण खूप नशीबवान आहोत. कारण आपण भारतासारख्या सुरक्षित देशात राहतो. म्हणून मी देशाच्या सरकारचे, भारतीय दूतावासाचे, इस्रायल दूतावासाचे आभार मानते. त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं म्हणून मी भारतात सुखरुप आहे…

‘मी सुखरुप परतली आहे. पण युद्धात अनेक जण अडकले आहेत. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते. लवकरच देशात शांती प्रस्थापित होईल यासाठी मी प्रार्थना करते.’ असं म्हणत अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नुशरत हिची चर्चा रंगली आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.