Pallavi Joshi | पल्लवी जोशीचा संताप, नसीरुद्दीन शाह यांना सुनावले खडेबोल, तुमचे मत हे कायम
नसीरुद्दीन शाह हे कायमच त्यांच्या विधानांमुळे जोरदार चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून सतत ते वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहेत. नसीरुद्दीन शाह यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच नसीरुद्दीन शाह यांनी चित्रपटांसाठी मिळणाऱ्या पुरस्कारांबद्दल मोठा खुलासा केला. नसीरुद्दीन शाह म्हणाले की, चित्रपटाला मिळणारा पुरस्कार (Award) हा एका लाॅबिंगचा परिणाम असतो. मी तर हल्ली पुरस्कार सोहळ्यास जाणे देखील बंद केले. यासोबतच नसीरुद्दीन शाह हे थेट पुरस्कारांची खिल्ली उडवताना देखील दिसले. नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.
नसीरुद्दीन शाह यांची फॅन फाॅलोइंग ही जबरदस्त दिसते. आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह हे गदर 2 आणि द कश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल बोलताना दिसले. नसीरुद्दीन शाह यांचे हे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर लोकांनी आता नसीरुद्दीन शाह यांना टार्गेट करण्यासही सुरूवात केली आहे.
नुकताच द कश्मीर फाईल्स चित्रपटातील अभिनेत्री पल्लवी जोशी हिने नसीरुद्दीन शाह यांचा चांगलाच समाचार घेत त्यांना खडेबोल सुनावले आहेत. पल्लवी जोशी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये बोलताना पल्लवी जोशी म्हणाली की, नसीरुद्दीन शाह द कश्मीर फाईल्स चित्रपटाला ज्या पद्धतीचे समजत आहेत तसा तो चित्रपटच मुळात नाहीये.
पुढे पल्लवी जोशी म्हणाली, नसीरुद्दीन शाह यांना विनंती करते की, माझ्या चित्रपटाबद्दल हे सर्व काही बोलण्याच्या अगोदर त्यांनी नक्कीच एकदा चित्रपट बघायला हवा. त्यानंतरच त्यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल त्यांचे मत बनवावे. मुळात म्हणजे मी जरी एखाद्या गोष्टीबद्दल बोलत असेल तर मी त्याची संपूर्ण माहिती अगोदरच घेतेच.
मला खरोखरच नसीरुद्दीन शाह यांच्या बोलण्याचा राग आलाय. कारण जर एखादी गोष्ट तुम्ही बघितलीच नसेल तर तुम्ही त्यावर भाष्य कसे करू शकता? त्यांनी चित्रपट न बघताच त्याच्यावर भाष्य केले आहे. ठिक आहे, परंतू आता काय करू शकतो ना? कारण जगच अशाप्रकारचे आहे. बाॅलिवूडच्या बदलत्या ट्रेंडवर देखील बोलताना नसीरुद्दीन शाह हे दिसले.
नसीरुद्दीन शाह यांना थेट खडेबोल सुनावताना पल्लवी जोशी ही दिसली आहे. मुळात म्हणजे नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे. विवेक अग्निहोत्री यांनीही नसीरुद्दीन शाह यांचा चांगलाच समाचार घेतल्याचे बघायला मिळाले. नसीरुद्दीन शाह यांना विवेक अग्निहोत्री यांनीही खडेबोल सुनावले आहेत.