Parineeti Chopra | ‘खासदाराची पत्नी होणारे म्हणून नखरे वाढलेत हिचे…’, परिणीती चोप्रा हिला असं का म्हणाले चाहते?

अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने असं केलं तरी काय, ज्यामुळे चाहते म्हणाले, 'खासदाराची पत्नी होणारे म्हणून नखरे वाढलेत हिचे...', सर्वत्र परिणीती चोप्रा हिची चर्चा...

Parineeti Chopra | 'खासदाराची पत्नी होणारे म्हणून नखरे वाढलेत हिचे...', परिणीती चोप्रा हिला असं का म्हणाले चाहते?
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 12:22 PM

मुंबई : अभिनेता परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत हॉटेल बाहेर जेव्हा परिणीतीला स्पॉट करण्यात आलं, तेव्हा पासून अभिनेत्री तुफान चर्चेत आहे. सुरुवातीचे काही दिवस परिणीती हिने राघव यांच्यासोबत असलेलं नातं स्वीकारलं नव्हतं. पण आता १३ मे रोजी राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी मोठ्या थाटात साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्यात अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. राघव चड्ढा यांच्यासोबत साखरपुडा झाल्यापासून परिणीती कायम चर्चेत असते. पण आता अभिनेत्री असं काही केलं, ज्यामुळे परिणीतीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

परिणीती नुकताच, मुंबई याठिकाणी एका कार्यक्रमासाठी पोहोचली होती. तेव्हा पापाराझींना पाहून अभिनेत्रीने संताप व्यक्त केला. अभिनेत्रीने फोटो क्लिक करण्यास नकार दिला आणि म्हणाली.. ‘आता हे सर्व बंद करा…’ एवढंच नाही तर, परिणीतीने जमलेल्या पापाराझींकडे पाठ फिरवली. अभिनेत्रीची ही वागणूक चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना बिलकूल आवडली नाही.

हे सुद्धा वाचा

सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘खासदाराची पत्नी होणारे म्हणून नखरे वाढलेत हिचे…’ तर अन्य एक युजर म्हणाला, ‘अजून एवढी मोठी सेलिब्रिटी पण नाही झाली, पण अहंकार तर किती आहे…’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे.

परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding)

परिणीतीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारताना दिसणा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सिनेमाचं शिर्षक अद्याप घोषित केललं नाही.

अभिनेत्री जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकमध्येच नाही तर, दिग्दर्शक इम्तियाज अली दिग्दर्शित अमर सिंग चमकीला यांच्या बायोपिकमध्ये देखील दिसणार आहे. सध्या सर्वत्र परिणीती तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.