आई होण्याची वेळ आली तेव्हा अभिनेत्रीने मोडलं लग्न; 3 वर्षांपूर्वी ‘या’ अभिनेत्यासोबत थाटला दुसरा संसार

पहिल्या पतीला हवं होतं कुटुंब, पण अभिनेत्रीला नव्हता द्यायचा स्वतःच्या बाळाला जन्म, आता दुसऱ्या पतीसोबत अभिनेत्री जगत आहे रॉयल आयुष्य... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आणि दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चा... कोण आहे 'ती' अभिनेत्री जिला नको होतं मातृत्व...

आई होण्याची वेळ आली तेव्हा अभिनेत्रीने मोडलं लग्न; 3 वर्षांपूर्वी 'या' अभिनेत्यासोबत थाटला दुसरा संसार
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 1:10 PM

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी कधीही स्वतःच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला नाही. यासाठी अभिनेत्रींनी लग्न करण्यास नकार दिला. पण एका अभिनेत्रीने लग्न तर केलं, पण कुटुंब वाढवण्याची वेळ आली तेव्हा पतीपासून विभक्त होण्याच निर्णय घेतला. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पूजा बत्रा आहे. पूजा हिने २००३ मध्ये अमेरिकेतील उद्योजक सोनू अहलूवालिया यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने अमेरिकेत राहण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर अभिनेत्रीने विवाहबंधनातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सोनू अहलूवालिया आणि पूजा बत्रा यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. कारण अहलूवालिया यांना कुटुंब वाढवायचं होतं, तर पूजा हिची आई होण्याची ईच्छा नव्हती. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये सोनू अहलूवालिया आणि पूजा बत्रा यांचं घटस्फोट झालं. सध्या सर्वत्र पूजा बत्रा हिची चर्चा रंगत आहे.

पहिल्या पतीसोबत घटस्फोटानंतर अभिनेत्री तिचं पूर्ण लक्ष तिच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. पण अभिनेत्रीला अभिनय क्षेत्रात यश मिळालं नाही. अशात अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. पूजा हिने अभिनेता नवाब शाह याच्यासोबत दुसरं लग्न केलं. नवाब शाह याने अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला.

हे सुद्धा वाचा

कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे पूजा बत्रा…

पूजा झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्रीला सिनेमांमध्ये संधी मिळत नसल्या तरी, जाहिरातींच्या माध्यमातून पूजा कोट्यवधी रुपयांची कमाई करते. शिवाय अभिनेत्री ग्लोबेललिंक प्रॉडक्शन हाऊसची देखील मालकीण आहे. जे चित्रपट सृष्टीत बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये महत्त्वाचं काम करतो. याशिवाय ती अमेरिकन रेडिओ स्टेशन मेरा संगीत-एलएची निर्माती पार्टनर देखील आहे.

पूजा हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने एक मॉडेल म्हणून करियरची सुरुवात केली. मॉडेलिंगच्या प्रवासात अभिनेत्रीने यशाचा टप्पा गाठला. त्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘विरासत’ सिनेमाची ऑफर मिळाल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत देखील मोठी झाली.

पूजा हिने ‘भाई’, ‘हसीना मान जाएगी’, ‘कहीं प्यार न हो जाए’ आणि ‘नायक’ यांसारख्या सिनेमामध्ये देखील भूमिका बजावली. पण अभिनेत्रील यश मिळालं नाही. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.