Preity Zinta हिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन; अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

Preity Zinta | 'माझ्यासाठी तुम्ही तुमच्या घराचं दार...', अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास; अभिनेत्री फोटो शेअर करत केल्या भावना व्यक्त...

Preity Zinta हिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन; अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 9:32 AM

मुंबई | 2 7 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री प्रिती झिंटा हिने (Preity Zinta) बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता प्रिती बॉलिवूडपासून दूर परदेशात पती आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण सर्वकाही सुरळीत सुरु असताना, अभिनेत्रीच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रिती झिंटा हिच्या जवळच्या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला आहे. ज्यामुळे कुटुंबात दुःखाचं वातावरण आहे. जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळे अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. प्रिती झिंटा हिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र प्रिती झिंटा हिची चर्चा सुरु आहे.

प्रिती झिंटा हिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सासऱ्यांचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. काही तासांपूर्वी अभिनेत्रीने सासऱ्यांचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री करवा चौथचा फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री नव्या नवरीप्रमाणे दिसत असून प्रितीने सासऱ्यांसोबत पोज दिली आहे. प्रिती झिंटा हिच्या सासऱ्यांचं नाव जॉन स्विंडल असं होतं.

हे सुद्धा वाचा

सासऱ्यांच्या निधमाचं दुःख व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, ‘प्रिय जॉन… मला तुमची कळकळ, तुमचा दयाळूपणा आणि सर्वात जास्त तुमची विनोदबुद्ध कायम स्मरणात राहिल. तुमच्यासोबत शुटिंगला जायला मला आवडायचं. तुमच्यासाठी तुमच्या आवडचे भारतीय पदार्थ बनवायला मला आवडायचं… कोणत्याही विषयावर तुमच्यासोबत गप्पा मारायला देखील मला आवडायचं.. माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी तुम्ही तुमच्या घराचे आणि मनाचे दार उघडले त्यासाठी आभार…’

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तुमच्या शिवाय कोणताही दिवस सारखा नाही… मला विश्वास आहे तुम्ही एका योग्य ठिकाणी आनंदी आहात… रेस्ट इन पीस… ओमशांती…’ अशी भावना प्रिती झिंटा हिने कॅप्शनच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र प्रिती झिंटा हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

प्रिती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, जीन गुडइनफ याच्यासोबत लग्न करत अभिनेत्री परदेशात गेली. २०१६ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये जीन गुडइनफशी लग्न केले. २०२१ मध्ये अभिनेत्री सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली. प्रिती आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

९० च्या दशकातील अभिनेत्री, प्रिती झिंटा स्टार बनण्यासाठी बॉलिवूडमध्ये आली. १९९८ मध्ये प्रितीने ‘दिल से’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. प्रितीने तिच्या स्मित हस्याने अनेकांची मने जिंकली. आजही चाहते प्रितीला विसरु शकलेले नाहीत…

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.