न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अभिनेत्रीचं जगणं झालं होतं कठीण, ‘ड्रायव्हरपासून वॉचमॅनपर्यंत प्रत्येण जण…’
'तेव्हा माझ्याकडे लपवण्यासाठी काहीही नव्हातं...', न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चार दिवस घराबाहेर निघाली नव्हती 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री... मराठी - हिंदी सिनेविश्वात तिचा बोलबाला...
मुंबई | 23 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये किसिंग सीन, इंटिमेट सीन कॉमन आहेत.. सिनेमाच्या कथेची गरज म्हणून अभिनेत्रींना त्यांच्या मर्यादा ओलांडून भूमिका साकारावी लागते. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत येतात. एवढंच नाही तर अभिनेत्रींना ट्रोलींगचा सामना करावा लागतो. पण अनेकदा अभिनेत्रींचे काही असे व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजते. आजपर्यंत अनेक अभिनेत्रींचे एमएमएस व्हायरल झाले. ज्यामुळे अभिनेत्रींना अनेक संकटांचा सामना करावा लागला. असंच काही बॉलिवूड आणि मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिच्यासोबत… ज्यामुळे अभिनेत्रीचं घरातून बाहेर निघणं देखील कठीण झालं आहे. या गोष्टीचा खुलासा खुद्द राधिका हिने एका मुलाखतीत केला होता. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती.
राधिका आपटे हिने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पार्च्ड’ सिनेमात एका सेक्स वर्करची भूमिका बजावली होती. भूमिकेसाठी अभिनेत्रीचं सर्वच स्तरातून कौतुक देखील करण्यात आलं. एका मुलाखतीत अभिनेत्री न्यून व्हिडीओबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. जे आज देखील चर्चेत आहे.
अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा क्लिन शेव शुटिंगच्या दरम्यान माझा एका न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला होता, तेव्हा मला वाईट प्रकारे ट्रोल करण्यात आलं होतं. चार दिवस मी स्वतःच्या घराबाहेर येवू शकत नव्हती. कारण ड्रायव्हर, वॅचमॅन यांनी देखील मला ओळखलं होतं.. ‘
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तो एक वादग्रस्त व्हिडीओ होता आणि त्यामध्ये मी नाही हे एखाद्या समजदार व्यक्तीने कदाचित ओळखलं देखील असेल.. मला असं वाटत नाही की कोणी करू शकतो किंवा कोणी केले पाहिजे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. नाही तर आपण उद्ध्वस्त होवू.. म्हणून जेव्हा ‘पार्च्ड’ सिनेमासाठी मी कपडे काढले, तेव्हा मला वाटलं माझ्याकडे लपवण्यासाठी काहीही नाही…’
‘पार्च्ड’ सिनेमाबद्दल राधिका म्हणाली, ‘मला मूळात अशी भूमिका करायची गरज होती. कारण जेव्हा तुम्ही बॉलिवूडमध्ये असता तेव्हा तुम्हाला कायम सल्ले दिले जातात की तुम्हाला तुमच्या शरीरासोबत काही तरी करावं लागतं. पण मी कायम सांगितलं की, मी चेहऱ्याला आणि शरीराला काहीही करणार नाही…’ राधिका कायम तिच्या दमदार भूमिकांमुळे चर्चेत असते.
‘मिसेस अंडरकव्हर’, ‘बदलापूर’, ‘कबाली’, ‘पॅड मॅन’, ‘विक्रम वेधा’, ‘बाझार’, ‘फोबिया’, ‘शोर इन द सीटी’, ‘रात एकेली हैं’ अशा अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत राधिका आपटे हिने झगमगत्या विश्वात स्वतःची भक्कम ओळख तयार केली आहे.