Bollywood | साइड बिझनेसमुळे ‘ही’ अभिनेत्री कमावते कोट्यवधी रुपये, भावासोबत करते मोठा व्यवसाय

Bollywood | फक्त सिनेमे नाही तर, साइड बिझनेसमुळे 'ही' अभिनेत्री झालीये मालामाल; भावासोबत अभिनेत्रीची यशाच्या दिशेने वाटचाल... हैदराबाद, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अभिनेत्रीचं आलिशान घर... सध्या अभिनेत्रीच्या रॉयल आयुष्याची चर्चा...

Bollywood | साइड बिझनेसमुळे 'ही' अभिनेत्री कमावते कोट्यवधी रुपये, भावासोबत करते मोठा व्यवसाय
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 12:39 PM

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांच्या संपत्तीमुळे आणि रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटी फक्त सिनेमा किंवा मालिकांच्या माध्यमातूनच कोट्यवधींची कमाई करत नाहीत, तर त्यांने अनेक व्यवसाय देखील करतात. बॉलिवूडमध्ये देखील अशी एक अभिनेत्री आहे, जिचे अनेक व्यवसाय आहे. शिवाय भावासोबत देखील अभिनेत्री व्यापार करते. सध्या ज्या अभिनेत्रीच्या व्यापाराबद्दल चर्चा रंगत आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रकूल प्रित सिंग आहे. रकूल हिने वयाच्या १८ व्या वर्षापासून मॉडलिंगला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

झगमगत्या विश्वात पदार्पण केल्यानंतर रकुल हिला अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. अनेक वर्ष स्ट्रगल केल्यानंतर २००९ मध्ये रकुल हिने कन्नड सिनेमाच्या माध्यमातून करियरला सुरुवात केली. अभिनेत्रीच्या पहिल्या सिनेमाचं नाव आहे Gilli… काही वर्षांनंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं.

२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारिया’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रकुल हिच्याबद्दल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अभिनेत्री उद्योग क्षेत्रात देखील पुढे आहे. फक्त सिनेमे नाही तर, साइड बिझनेसमुळे अभिनेत्री  कोट्यवधींची माया कमावते.

हे सुद्धा वाचा

भावासोबत अभिनेत्रीचा व्यवसाय

रकुल प्रीत सिंग हिच्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री जिमची मालक आहे. F45 Training असं अभिनेत्रीच्या जिमचं नाव आहे. F45 Training याच नावाने अभिनेत्रीच्या दोन जिम आहेत. हैदराबादमध्ये दोन आणि विशाखापट्टणममध्ये एक जिम आहे. ज्यामुळे अभिनेत्री मोठी कमाई करते.

शिवाय भावासोबत देखील अभिनेत्रीची यशाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अभिनेत्रीच्या भावाचं नाव अमन प्रीत सिंग आहे. भावासोबत अभिनेत्रीने ‘स्टारिंग यू’ नावाचं अॅपही लॉन्च केले. २०२१ मध्ये दोघांनी नवीन व्यवसाय सुरु केला आहे. एवढंच नाही तर, अमन ‘राम राज्य’मधून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यास सज्ज आहे.

रकुल प्रीत सिंग हिचा बॉयफ्रेंड

रकुल प्रीत सिंग हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांचं हैदराबादमध्ये घर आहे. मुंबईत देखील स्वतःचा अपार्टमेंट आहे.  सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.