रेखा यांना महिन्याला लाखो रुपये येतं भाडं, अब्जवधी रुपयांची संपत्ती, अनेक ठिकाणी प्रॉपर्टी
Rekha Income Source: अब्जवधी रुपयांच्या मालकीण आहेत रेखा... बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी करतात तगडी कमाई, अब्जवधी रुपयांची संपत्ती, अनेक ठिकाणी प्रॉपर्टी, रेखा कायम असतात कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत...
‘सिलसीला’, ‘खुन भरी मांग’, ‘उमराव जान’, ‘कोई… मिल गया’, ‘क्रिश’, ‘दिल है तुम्हाला’, ‘घर’, ‘नागीन’, ‘क्रिश 3’ यांसारख्या अनेक सिनेमात रेखा यांनी एकापेक्षा एका भूमिका साकारत चाहत्यांच मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, सेलिब्रिटींमध्ये देखील रेखा यांच्या चर्चा असायच्या. आज रेखा बॉलिवूडपासून दूर असल्यातरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आजही त्यांच्या सौंदर्याची चर्चा रंगेलली असते. रेखा बॉलिवूडपासून दूर असल्यातरी बक्कळ पैसा कमावतात.
रेखा यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण त्यांनी कधीच माघार घेतली नाही. आज रेखा स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर रॉयल आयुष्य जगत आहेत. रेखा यांच्याकडे कोट्यवधी नाही तर, अब्जवधी रुपयांची संपत्ती आहे. महिन्याला रेखा तगडी कमाई करतात.
रेखा यांची संपत्ती फक्त मुंबईमध्ये नाही तर, दक्षिण भारतात देखील आहे. ज्यामुळे रेखा यांना प्रत्येक महिन्याला लाखो रुपयांनी भाडं येतं. शिवाय त्यांच्याकडे महागड्या गाड्या देखील आहे. रेखा मुंबईमध्ये भव्य बंगल्यात राहतात. रेखा यांच्या बंगल्याचं नाव ‘बसेरा’ असं आहे. रेखा यांचा बंगला प्रचंड आलिशान आहे.
रेखा यांना महिन्याला लाखो रुपये भाडं तर येतंच पण, अनेक शोमध्ये रेखा पाहुण्या म्हणून जातात. ज्यासाठी शोच्या निर्मात्यांना मोठी रक्कम मोजावी लागते. शिवाय एखाद्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी देखील रेखा जास्त फी घेतात. जाहिरांतींच्या माध्यमातून देखील रेखा कोट्यवधींची माया कमावतात.
रेखा यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्याकडे 40 मिलियन डॉलर म्हणजे, जवळपास 25 अब्ज रुपये आहे. एवढंच नाही तर, रेखा यांच्याकडे असलेल्या दागिन्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ज्यांची किंमत हैराण करणारी आहे.
रेखा यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. रेखा यांच्याकडे लँड रोव्हर डिस्कव्हरी, बीएमडब्ल्यू ३ सीरिज, Mitsubishi Outlander आणि टाटा नेक्सा यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. रेखा यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर रेखा यांच्याकडे ४० मिलियन डॉलर म्हणजे 25 अब्ज रुपयांची संपत्ती आहे.
रेखा यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी जवळपास 200 सिनेमांमध्ये काम केलं. आज रेखा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी संपत्तीमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकतात. रिपोर्टनुसार रेखा यांच्याकडे वांद्रे याठिकाणी आलिशान बंगला आहे. त्यांच्या बंगल्याची किंमत जवळपास 13 कोटी रुपये आहे.