Sushmita Sen : स्टाईल – लूकमध्ये आईच्या एक पाऊल पुढे लेक, चाहते म्हणाले, ‘याला म्हणतात क्लास’

सुष्मिता सेन हिच्या लेकीच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा, आईपेक्षा कित्येक पटीने ग्लॅमरस दिसते अभिनेत्रीची मुलगी रेने... फोटो पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

Sushmita Sen : स्टाईल - लूकमध्ये आईच्या एक पाऊल पुढे लेक, चाहते म्हणाले, 'याला म्हणतात क्लास'
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 11:10 AM

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन (sushmita sen) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सुष्मिताने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनार घर केलं. १९९४ हे वर्ष भारतासाठी संस्मरणीय ठरलं. कारण मिस युनिव्हर्स स्पर्धेत पहिल्यांदाच आपल्या देशाने यशाची पताका फडकवली. सुष्मिता सेन भारताची पहिली मिस युनिव्हर्स बनली. तेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सुष्मिता हिच्या नावाची चर्ची होती. मिस वर्ल्ड झाल्यानंतर सुष्मिताने अभिनयाच्या विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ सिनेमातून सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

मिस युनिव्हर्स म्हणून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये देखील फार कमी काळात अभिनेत्री स्वतःचं स्थान भक्कम केलं. त्यानंतर सुष्मिताने लग्न न करता दोन मुलींना दत्तक घेतलं आणि आज अभिनेत्री तिच्या दोन मुलींसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. सुष्मिताच्या मोठ्या मुलीचं नाव रेने आणि लहान मुलीचं नाव आलिशा असं आहे.

अभिनेत्रीची मोठी मुलगी आईपेक्षा कित्येत पटीने हॉट आणि ग्लॅमरस आहे. अभिनेत्रीची मोठी मुलगी रेने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रेने हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. नुकताच रेने हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये रेने सोफ्यावर बसून पोझ देताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या सर्वत्र सुष्मिता हिची मोठी मुलगी रेने हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांची चर्चा रंगत आहे. तिच्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. एक चाहता रेनेच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘तू तर पुढची मिस युनिव्हर्स दिसत आहेस…’. तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘याला म्हणतात क्लास…’

रेने हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, रेने देखील आई प्रमाणे प्रचंड हुशार आणि मेहनती आहे. रेने हिने ‘सुट्टाबाजी’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. १३ मिनिटांच्या सिनेमात रेने हिने दाखवून दिलं आहे की, ती देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. एवढंच नाही तर, रेने अन्य प्रोजेक्टमधून देखील दिसणार आहे.

सुष्मिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री ‘आर्या २’ वेब सीरिजच्या यशानंतर ‘आर्या ३’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारकाना दिसणार आहे. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या ‘आर्या ३’ सीरिजची चर्चा रंगत आहे. चाहते ‘आर्या ३’च्या प्रतीक्षेत आहेत. सुष्मिता कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. त्यामुळे अभिनेत्री ‘आर्या ३’ सीरिजची घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.