Taali : ‘कोई हिजडा कहता है तो कोई…’, ट्रान्सजेंडरचं आयुष्य रुपेरी पडद्यावर मांडणार सुष्मिता सेन

'कोई हिजडा कहता है तो कोई...', अभिनेत्री सुष्मिता सेन हिने पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र सुष्मिता सेन हिच्या आगामी सीरिजची चर्चा

Taali : 'कोई हिजडा कहता है तो कोई...',  ट्रान्सजेंडरचं आयुष्य रुपेरी पडद्यावर मांडणार सुष्मिता सेन
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 7:50 PM

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : ‘आर्या’ वेब सीरिजनंतर अभिनेत्री सुष्मिता सेन ‘ताली’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सु्ष्मिता ‘ताली’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सुष्मिता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी सीरिज संबंधीत प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. आता देखील अभिनेत्रीने सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी  सोशल मीडियावर एक दमदार व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये सुष्मिता दमदार भूमिकेत दिसत आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते ट्रेलरच्या प्रतीक्षेत आहेत. पण अभिनेत्रीने आता पोस्ट केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ट्रेलर पूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने मोठी घोषणा केली आहे. ‘ताली’ वेब सीरिजचा व्हिडीओ सोमवारी प्रदर्शित होणार असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. तर व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘कोई हिजडा बुलाता है तो कोई नौटंकी, तो कोई गेमचेंजर…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र ‘ताली’ या वेब सीरिजची चर्चा सुरु आहे.

नेटकऱ्यांना देखील अभिनेत्रीने पोस्ट केलेला व्हिडीओ आवडला आहे. व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सुष्मिता सेन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता ‘आर्या’ वेब सीरिज नंतर अभिनेत्री ‘ताली’ सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे…

‘ताली’ वेब सीरिज सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. १५ ऑगस्ट रोजी ‘ताली’ वेब सीरिज प्रेक्षकांना जीओ सिनेमावर मोफत पाहता येणार आहे. स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या श्रीगौरी सावंत यांचा प्रवास प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सुष्मिता हिच्या काही चाहत्यांना अभिनेत्रीची नवीन भूमिका आवडली आहे, तर काहींनी मात्र सुष्मिताला ट्रोल केलं आहे. होत असलेल्या ट्रोलिंगवर देखील सु्ष्मिता हिने वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘तालीचा पहिला पोस्टर शेअर केल्यानंतर कमेंटमध्ये अनेक जण मला ‘छक्का’ म्हणाले. मी विचार केला, ते माझ्यासोबत असं कसं वागू शकतात? ‘

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी ते वैयक्तिकरित्या घेतलं कारण ते माझ्या टाइमलाइनवर घडत होतं. मी त्या सर्वांना ब्लॉक केलं. मी फक्त भूमिका साकारली म्हणून मला इतकं ट्रोल करण्यात आलं, तर श्रीगौरी सावंत यांनी काय – काय सहन केलं असेल…’ सध्या सर्वत्र श्रीगौरी सावंत यांच्यावर आधारित ‘ताली’ वेब सीरिजची चर्चा रंगत आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.