‘दुसऱ्यांच्या बेडवर घुसण्याची घाई…’, रिलेशनशिप, इंटिमेसी, सेक्स… तरुणांना अभिनेत्री असं का म्हणाली?
Bollywood Actress on Relationship : तरुण मुलांबद्दल अभिनेत्रीचं सडेतोड वक्तव्य, रिलेशनशिप, इंटिमसी, सेक्स... इत्यादी गोष्टींवर भाष्य करत अभिनेत्री म्हणाली, 'दुसऱ्यांच्या बेडवर घुसण्याची घाई...', सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...
मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : सध्याच्या काळात प्रेम, ब्रेकअप, रिलेशनशिप, इंटिमसी इत्यादी गोष्टींची चर्चा होत असते. अचानक आयुष्यात निघून गेलेली व्यक्ती, त्यानंतर सतत होणाऱ्या वेदना यांसारख्या गोष्टींमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांचे स्वतःचे अनुभव सांगत तरुणांना सावध केलं आहे. अभिनेत्री झीनत अमान देखील तरुणांना अनेक सल्ले देत असतात. झीनत अमान आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
एका मुलाखतीत अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी सेक्स, इंटिमेसी आणि नात्यांमध्ये संवादाचं महत्त्व पटवून दिलं आहे. झीनत अमान म्हणाल्या, ‘तुम्हाला पार्ट टाईमसाठी आयुष्यात असलेल्या लोकांना फुल टाईम स्थान देण्याची काहीही गरज नाही.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झीनत अमान यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सुरुवातील झीनत अमान म्हणाल्या, ‘दुसऱ्यांच्या बेडवर घुसण्याची घाई करु नये. तरुण मुलांनी स्वतःच्या शरीरावर थोडं नियंत्रण ठेवायला हवं. इंटिमेसी सेक्समध्ये कधीच नसते. तुमच्या सोबत असलेला व्यक्ती खरंच तुमच्या सोबत आहे का? तुमच्या सोबत असलेला व्यक्ती तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला स्वीकारण्यासाठी तयार आहे का? या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी थोडा वेळ लागतो, हे देखील तितकंच खरं आहे.’
पुढे झीनत अमान म्हणाल्या, ‘माझ्यासाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि व्यक्ती दयाळू असायला हवा. स्वतःच्या भावना व्यक्त करा. समोरच्या व्यक्तीच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, जाणून घ्या. तुमच्या मनात काय आहे, हे देखील तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगा…’
‘तुमची स्वप्न, तुमच्या अपेक्षा काय आहेत, या सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगा. तुमच्या दोघांमध्ये काही साम्य आहे का, तुम्ही एकत्र भविष्याचा विचार करु शकता का, एकमेकांना साथ देऊ शकता का? सर्व गोष्टीचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. जर समोरच्या व्यक्तीकडे अनेक ऑप्शन असतील तर, तुम्ही स्वतःच्या त्या ऑप्शनच्या यादीतून बाहेर व्हा… अशा नात्यांची आयुष्यात काहीही गरज नाही.’ असं देखील झीनत अमान आजत्या काळातील तरुणांना म्हणाल्या.