Tabu | प्रसिद्ध अभिनेत्याला तब्बूने 10 वर्ष केलं डेट; त्याच्याच मुलासोबत अभिनेत्राचे आज खास कनेक्शन

१० वर्ष प्रसिद्ध अभिनेत्याला डेट केल्यानंतर नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही; त्याच अभिनेत्याच्या मुलासोबत आज अभिनेत्रीचे खास कनेक्शन; अनेक वर्षांनंतर सत्य समोर...

Tabu | प्रसिद्ध अभिनेत्याला तब्बूने 10 वर्ष केलं डेट; त्याच्याच मुलासोबत अभिनेत्राचे आज खास कनेक्शन
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 9:49 AM

मुंबई | बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. आजही काही सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत असतात. सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे, अभिनेत्री तब्बू हिचं. बॉलिवूडमध्ये यशच्या उच्च शिखरावर चढत असताना तब्बूचं अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा देखील तुफान रंगली. पण कोणत्याही अभिनेत्यासोबत तब्बूचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आजही अभिनेत्री प्रसिद्धी, संपत्ती सर्वकाही असताना एकटं आयु्ष्य जगते. पण बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) आणि तब्बू यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली…

नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू यांनी एकमेकांना एक दोन नाही तर, चक्क १० वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकली नाही. कारण अभिनेता तेव्हा विवाहित होता. शिवाय नागार्जुन अक्किनेनी याला एक मुलगा देखील होता. अखेर अभिनेत्याने प्रेमाचा त्याग करत कुटुंबाला अधिक महत्त्व दिलं. ( Are Tabu and Nagarjuna still together)

51 वर्षीय अभिनेत्री ही भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू यांच्या नात्याच्या चर्चा सर्वदूर पसरल्या होत्या. शिवाय अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. ज्यामुळे सर्वांना त्यांच्या नात्याबद्दल कळालं. एवढंच नाही तर, मुलाखीतीत दोघांनी त्यांच्या नात्यावर स्पष्टीकरण देखील दिलं.

नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. दरम्यान, एका मुलाखतीत नागार्जुन याचा मुलगा नागा चैतन्य याला ‘बॉलिवूडच्या कोणत्या स्टारसोबत तुझे चांगले संबंध आहेत?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नागा चैतन्य म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये माझे अधिक चांगलं संबंध नाहीत. आमिर खान आणि तब्बू यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत…’

नागा चैतन्य याच्या वक्तव्यानंतर पुन्हा नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू यांच्या नात्याची चर्चा जोर धारत आहे. दिग्दर्शक करण जोहर याच्या मुलाखतीत तब्बूने अभिनेत्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. ‘अक्किनेनी नागार्जुन माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींपैकी एक आहे. तो कायम माझ्या मनात राहिल. या जगात कोणतंच नातं आम्हाला वेगळं करु शकत नाही. अक्किनेनी नागार्जुन याच्यासोबत असलेल्या नात्याला लावयला माझ्याकडे कोणतंही लेबल नाही. आमच्यातील मैत्री कोणतंही दुसरं नातं तोडू शकत नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.