बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी नॉर्मल डिलिव्हरीच्या माध्यमातून दिला चिमुकल्यांना जन्म
नॉर्मल डिलिव्हरीच्या त्रासाला सामोऱ्या गेल्या आहेत 'या' बॉलिवूड अभिनेत्री; कपूर ते बच्चन कुटुंबियांच्या सुनांनी नाही केली स्वतःच्या फिगरची चिंता
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कामय त्यांच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असतात. स्वतःला फिट ठेवणाऱ्या अभिनेत्रींना अनेकदा जीमच्या बाहेर स्पॉट देखील करण्यात येतं. एवढंच नाही तर, काही अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी सर्जरी देखील केली. पण बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा देखील आहेतं, ज्यांनी सौंदर्य, फिगर कोणत्याही गोष्टीची काळजी न करता त्यांच्या चिमुकल्यांना नॉर्मल डिलिव्हरीच्या माध्यमातून जन्म दिला. आज आपण जाणून घेवू त्या अभिनेत्रींबद्दल ज्या नॉर्मल डिलिव्हरीनंतर आई झाल्या.
अभिनेत्री ऐश्वर्या राय माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वरा राय बच्चन हिने २०११ मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म देताना ऐश्वर्याने नॉर्मल डिलिव्हरीला प्राधान्य दिलं. आराध्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन आहे.
अभिनेत्री रवीना टंडन मस्त-मस्त गर्ल अभिनेत्री रवीना टंडन कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. रवीना कायम तिच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. महत्त्वाचं म्हणजे रवीनाने देखील मुलाच्या जन्मासाठी नॉर्मल डिलिव्हरीला प्रधान्य दिलं होतं.
अभिनेत्री ट्विंकल खन्ना अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या मुलीचा जन्म २०१२ मध्ये झाला होता. ट्विंकलने मुलीचा जन्म नॉर्मल डिलिव्हरीच्या माध्यमातून झाला. ब्रीच कँडी रुग्णालयात ट्विंकलने मुलीला जन्म दिला. ट्विंकल आणि अक्षय यांच्या मुलीचं नाव नितारा असं आहे.
मीरा राजपूत कपूर अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर तिच्या स्टायलिश अंदाजामुळे ओळखली जाते. मीरा फार कमी वयात दोन मुलांची आई झाली. मीराने २०१६ मध्ये मुलीला नॉर्मल डिलिव्हरीच्या माध्यमातून जन्म दिला.
सुझान खान अभिनेता हृतिक रोशन याची पहिली पत्नी सुझान खान हिने दोन्ही मुलांनी नॉर्मल डिलिव्हरीच्या माध्यमातून जन्म दिला. सुझान आणि हृतिक विभक्त झाले असले तरी मुलांसाठी मात्र कायम एकत्र येतात.